Home » छायादालन, ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य » शशिकलांचा आज शपथविधी

शशिकलांचा आज शपथविधी

-पन्नीरसेल्वम् यांचा राजीनामा मंजूर,
चेन्नई, [६ फेब्रुवारी] – तामिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज सोमवारी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम् यांचा राजीनामा स्वीकृत केला. यामुळे मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याचा व्ही. के. शशिकला यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्या उद्या मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
शशिकला यांची अण्णाद्रमुकच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रिपदी आरूढ होता यावे, यासाठी पन्नीरसेल्वम् यांनी रविवारी पदाचा राजीनामा दिला होता.
आपल्याला पन्नीरसेल्वम् यांचा राजीनामा प्राप्त झाला असून, तो स्वीकृत करण्यात आला आहे. तथापि, पर्यायी व्यवस्था होईपर्यंत त्यांनी हंगामी मुख्यमंत्री म्हणून पदावर कायम राहावे, अशी सूचना राज्यपालांनी केली आहे. जयललिता यांचे गेल्या वर्षी ५ डिसेंबर रोजी निधन झाल्यानंतर त्याच रात्री पन्नीरसेल्वम् यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
तामिळनाडूत ‘चिनम्मा’राज
ज्याप्रमाणे जयललिता यांना ‘अम्मा’ म्हणून ओळखले जात होते, तसेच शशिकला यांना ‘चिनम्मा’ या नावाने ओळखले जाते. जयललिता यांची सावली म्हणूनच त्या आजवर राहिलेल्या आहेत. मी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारावी, यासाठी माझ्यावर सर्वप्रथम पन्नीरसेल्वम् यांनीच दबाव आणला होता, असे शशिकला यांनी पत्रकारांना सांगितले.
दरम्यान, जयललिता यांच्या भ्रष्टाचार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात आठवडाभरातच आपला निकाल देणार असल्याने शशिकला यांना उद्या मंगळवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापासून रोखण्यात यावे, अशी विनंती करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29422

Posted by on Feb 7 2017. Filed under छायादालन, ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य (62 of 2477 articles)


सॅन फ्रान्सिस्को, [६ फेब्रुवारी] - भारतीय वंशाच्या अमेरिकन विद्यार्थ्याने समुद्राचे खारे पाणी  पेयजलात रूपांतरित करण्याचा जगातील आजवरचा सर्वात स्वस्त आणि ...

×