richwood
richwood
richwood
Home » छायादालन, ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » श्रीनगरमध्ये जमावाकडून पोलिस अधिकार्‍याची ठेचून हत्या

श्रीनगरमध्ये जमावाकडून पोलिस अधिकार्‍याची ठेचून हत्या

=गळा आवळून व दगडांनी ठेचून मारले,
श्रीनगर, २३ जून –
श्रीनगर शहराच्या नौहाटा भागातील जामिया मशिदीच्या परिसरात ड्युटीवर असलेल्या एका पोलिस अधिकार्‍याला संतप्त जमावाने गळा दाबून आणि दगडांनी ठेचून ठार मारले. आज शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास ही थरारक घटना घडली.
मोहम्मद अयुब पंडित असे या पोलिस अधिकार्‍याचे नाव असून, त्यांना मशिदीच्या परिसरात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. ते मशिदीचे छायाचित्र कॅमेरात टिपत असताना, नागरिकांना त्यांच्यावर वेगळाच संशय आला आणि त्यांनी कुठलाही विचार न करता त्यांना अमानुषपणे मारहाण केली. अनेक लोक त्यांच्यावर दगडांचा वर्षाव करीत होते. यानंतर काहींनी त्यांचा गळा आवळला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानतंर जमावाने त्यांचे सर्व कपडे फाडून टाकले, अशी माहिती पोलिस महासंचालक एस. पी. वैद यांनी वृत्तसंस्थेला दिली.
रमजानच्या महिन्यातील शेवटचा शुक्रवार लक्षात घेता मशिद आणि आसपासच्या परिसरात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडायला नको, यासाठी पोलिस गस्त घालत होते.
यावेळी जामिया मशिदीत ‘शब-ए-कद्र’ची प्रार्थना सुरू होती. मोहम्मद अयुब मशिदीचे छायाचित्र काढत असल्याचा जमावाचा गैरसमज झाला. गोंधळ उडाल्याने अयुब यांनी हवेत गोळीबार केला. त्यात तीन जण जखमी झाले. त्यानंतर अयुब यांच्यावर हल्ला केला, असे वेद यांनी सांगितले.
त्यांचे पार्थिव पोलिस नियंत्रण कक्षात आणल्यानंतर त्यांची ओळख पटली. या घटनेमुळे जुन्या श्रीनगर शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली असून, सुरक्षा जवानांच्या छावण्यांवरही जमावाने दगडफेक केली. स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस आणि सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे.
दोघांना अटक
पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून, आणखीही काही लोकांना व्हिडीओ फूटेजच्या आधारावर अटक करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हत्येचा कट आधीच शिजला होता
दरम्यान, अयुब यांची हत्या करण्याचा कट आधीच शिजला होता. त्यांना ठार मारण्यासाठी फुटीरतावादी नेत्यांनी जमावाला प्रोत्साहित केले होते, असा दावा वेद यांनी केला आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=34797

Posted by on 12:56 am. Filed under छायादालन, ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google