Home » छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » संपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला

संपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला

=•चिदम्बरम् यांची कबुली •
=निवडणुकीला लागणारा पैसाच भ्रष्टाचाराचे मूळ,
मुंबई, १९ नोव्हेंबर – संपुआ-२ सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचारांमुळे सरकारची प्रतिमा मलीन झाली, हे खरे आहे. मात्र, जोपर्यंत कोणालाही दोषी ठरवले जात नाही किंवा शिक्षा होत नाही, तोपर्यंत मी त्यांना दोषी मानणार नाही, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम् यांनी केले. रविवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. मोदी सरकारला २०१९ पर्यंत संपुआ-२ प्रमाणे भ्रष्टाचाराचे ग्रहण लागेल, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
चिदम्बरम् पुढे म्हणाले, कॉंग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कालावधीत अनेक घोटाळे झाले. २०१९ पर्यंत मोदी सरकारच्या बाबतीतही तेच घडेल. संपुआ-२ सरकारने आपला नियोजित कार्यकाळ पूर्ण केला होता. मात्र, या कालावधीत सरकारची प्रतिमा मलीन झाली. त्यामुळे भविष्यात पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणार्‍या कोणत्याही सरकारी व्यवस्थेला भ्रष्टाचाराची कीड लागेलच. परंतु असे घडू नये, ही माझी मनापासूनची इच्छा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सध्या ज्यांच्यावर आरोप आहेत त्या सर्वांना दोषी म्हणून गृहीत धरले जात आहे. ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. त्यामुळे देशातील कायदे पायदळी तुडवले जातात.
याशिवाय, निवडणुकीसाठी पैसा उभारण्याची गरज हे भ्रष्टाचाराचे प्रमुख कारण असल्याचेही त्यांनी म्हटले. एखादी राजकीय व्यक्ती किंवा पक्षाच्या बाबतीत निवडणुकीसाठी लागणारा पैसा उभारण्याच्या नादात भ्रष्टाचार होण्याची शक्यता असते. त्यामुळे निवडणुकीसाठी पैसा उभारण्यासाठी नवे पर्याय अस्तित्वात येईपर्यंत या भ्रष्टाचाराची पातळी खाली येणार नाही, असे मतही चिदम्बरम् यांनी व्यक्त केले. (वृत्तसंस्था)

Short URL: http://vrittabharati.in/?p=35017

Posted by on Nov 22 2017. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (2 of 2474 articles)


=डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन, [caption id="attachment_35015" align="alignleft" width="300"] RSS Chief Mohan Bhagwat participated in a function on the ocassion ...

×