Home » उ.प्रदेश, छायादालन, ठळक बातम्या, राज्य » सपाचा काँग्रेसला धक्का

सपाचा काँग्रेसला धक्का

►केवळ ५४ जागांवर समाधान माना
►युती तुटण्याच्या मार्गावर,
वृत्तसंस्था
लखनौ, २० जानेवारी –
राष्ट्रीय लोकदलाशी कोणतेही संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीने आज शुक्रवारी काँग्रेसलाही धक्का दिला. केवळ ५४ जागांवर समाधान मानत असाल तर युती शक्य आहे, असा कडक संदेश सपाने दिला आहे. यामुळे सपा-काँग्रेसमध्ये युती होण्याची शक्यता आता धूसर झाली आहे.
४०३ सदस्यीय विधानसभेसाठी सपाने आज २०९ उमेदवारांची यादी जाहीर केली. यातील बहुतांश जागा अशा आहेत, जिथे आपली स्थिती बळकट असल्याचा काँग्रेसला विश्‍वास आहे. शिवाय, युतीच्या मुद्यांसोबतच जागा वाटपावरही एकत्रित बसून चर्चा करण्याचे आश्‍वासन सपाने कॉंग्रेसला दिले होते. मात्र, सपाचे सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री अखिलेश आज काँग्रेसला विश्‍वासात घेणे तर सोडाच, साधी चर्चाही न करता पक्षाचे उमेदवार जाहीर केले आणि तिसरी यादी पुढील आठवड्यात जाहीर होणार असल्याचे स्पष्ट केले.
भाजपाचा पराभव करायचा असेल, तर सपाच्या फार्म्युल्यानुसारच वागावे लागेल. आम्ही काँग्रेसला केवळ ५४ जागा देऊ शकतो. फार तर त्यात आणखी २५ ते ३० जागा आणखी जोडू शकतो. त्यापेक्षा जास्त जागांची काँग्रेसने अपेक्षाही करू नये. ज्या जागा आम्ही काँग्रेसला देणार आहोत, त्या जागांवर यापूर्वीच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार पहिल्या किंवा दुसर्‍या स्थानावर असावे किंवा अशा जागा जिथे सपाचे उमेदवार चौथ्या किंवा पाचव्या स्थानावर होते, अशाच जागा आम्ही काँग्रेससाठी सोडू शकतो, असे सपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किरणमय नंदा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कॉंग्रेससोबत युती व्हावे, यासाठी आम्ही आतापर्यंत बरेच प्रयत्न केले, पण काँग्रेसकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असे सांगताना, कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी विधानसभेची जागा त्या पक्षाकरिता सोडण्यास नंदा यांनी नकार दिला.
रालोद-जदयू युती सर्व जागा लढविणार
समाजवादी पार्टी आणि काँग्रेसने मैत्रीचा हात नाकारल्यानंतर संतप्त झालेल्या राष्ट्रीय लोकदलाने जदयूसोबत युती करून उत्तरप्रदेशातील सर्वच ४०३ जागा लढविण्याची घोषणा आज शुक्रवारी केली. यामुळे राज्यात महाआघाडी स्थापन होण्याची शक्यता आता पूर्णपणे मावळली आहे. आमच्या युतीत आणखी १० लहान राजकीय पक्षांचा समावेश आहे, अशी माहिती रालोदचे प्रदेशाध्यक्ष मसूद अहमद यांनी या सर्व पक्षांच्या बैठकीनंतर पत्रकारांना दिली. ज्या मतदारसंघात ज्या पक्षाची स्थिती मजबूत आहे, तिथे त्यांचाच उमेदवार दिला जाईल, असेही ते म्हणाले.
उत्तर प्रदेशात भाजपालाच बहुमत : शाहनवाझ हुसेन
नवी दिल्ली – समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशात कुठल्याही पक्षासोबत युती केली, तरी ते जिंकू  शकणार नाहीत. उत्तर प्रदेशात भाजपालाच बहुमत मिळेल, असा विश्‍वास भाजपा नेते शाहनवाझ हुसेन यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना हुसेन म्हणाले, यादव कुटुंबातील वाद दिखाऊ असून, कॉंग्रेसची एकही जागा मिळवण्याची ताकद नसताना समाजवादी पक्षाने त्यांच्यासोबत युती केली आहे. या युतीने आमच्यावर काहीही फरक पडणार नाही. मुलायमसिंह, शिवपाल आणि अखिलेश त्यांच्यात वाद आहे, असे भासवून त्यांचे गुन्हे लपविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सपाने गुन्हेगारांना प्रोत्साहन दिले असून घोटाळ्यांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29397

Posted by on Jan 21 2017. Filed under उ.प्रदेश, छायादालन, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.प्रदेश, छायादालन, ठळक बातम्या, राज्य (71 of 2477 articles)


►उत्सव साजरा करण्याचा मार्ग मोकळा, नवी दिल्ली, [० जानेवारी] - जलीकट्टूवरील बंदीमुळे संतप्त जनता रस्त्यावर उतरली असतानाच, जनक्षोभ शांत करण्यासाठी ...

×