Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » सर्वांचे कल्याण हीच भारतीय संस्कृती :पंतप्रधान

सर्वांचे कल्याण हीच भारतीय संस्कृती :पंतप्रधान

-श्रीलंकेच्या राष्ट्रपतींसह केले आंतरराष्ट्रीय विचार कुंभ समारोपात मार्गदर्शन=

Ujjain: Prime Minister Narendra Modi and President of Sri Lanka Maithripala Sirisena at the International Vichar Maha Kumbh during Simhastha Maha Kumbh Mela in Ujjain on Saturday. PTI Photo (PTI5_14_2016_000060B)

Ujjain: Prime Minister Narendra Modi and President of Sri Lanka Maithripala Sirisena at the International Vichar Maha Kumbh during Simhastha Maha Kumbh Mela in Ujjain on Saturday. PTI Photo
(PTI5_14_2016_000060B)

उज्जैन, [१४ मे] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सीरिसेना यांच्यासोबत येथील सिंहस्थ महाकुंभाच्या अनुषंगाने उज्जैनजवळील निनोरा गावात आयोजित आंतरराष्ट्रीय विचार कुंभाच्या समारोप समारंभाप्रसंगी सिंहस्थ जाहीरनामा प्रसिद्ध केला. सिंहस्थाच्या जागतिक संदेशावरील आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी ‘सर्वांचे कल्याण’ हीच भावना भारतीय संस्कृतीत खोलवर रूजलेली आहे, असे प्रतिपादन केले.
जगाला भारतातर्फे संदेश देताना पंतप्रधानांनी जाहीरनामा प्रसिद्ध करून ५१ मुद्यांवर चर्चा केली. समाजाकरिता निस्वार्थ काम करणार्‍या लोकांची शक्ती समाजाच्या कल्याणाकरिताच उपयोगात यायला हवी, असे पंतप्रधान म्हणाले.
मानवता आणि जगाला योग्य दिशा देण्यासाठी भारताला बळकट करणे आवश्यक आहे. वेदांच्या प्रकाशात उपनिषदांची रचना होते, उपनिषदांच्या प्रकाशात श्रुती-स्मृतींची रचना होते आणि त्या माध्यमातून मानवतेला नवी दिशा मिळत असते, असे सांगताना पंतप्रधान म्हणाले की, ग्लोबल वॉर्मिंग आणि दहशतवाद या दोन मुख्य समस्या संपूर्ण जगाला भेडसावत आहेत. अशा स्थितीत आमच्या देशात आयोजित होणार्‍या महाकुंभ मेळ्यांमधून समस्यांवर तोडगा काढण्याचे धडे मिळत असतात. आमची जी परंपरा राहिली आहे ती सर्वांच्या कल्याणाचीच आहे. एक भिक्षूक देखील ‘जो देईल त्याचेही देव कल्याण करेल आणि जो देणार नाही, त्याचेही कल्याण होवो,’ असेच शुभ शब्द वापरतो.
यावेळी त्यांनी भारतातील निवडणुकीचाही आवर्जून उल्लेख केला. लोकसंख्या आणि प्रचंड भौगोलिक व्याप असलेल्या भारतात होणार्‍या निवडणुका पाहून संपूर्ण जग आश्‍चर्यचकित होत असते. कोट्यवधी मतदार असलेल्या या देशात तीन सदस्यीय निवडणूक आयोग इतक्या शांततेत आणि व्यवस्थितपणे निवडणुका कसे हाताळते, हा जगासाठी एक आदर्शच आहे, असे ते म्हणाले. मध्यप्रदेशातील क्षिप्रा नदीच्या किनार्‍यावर गेल्या काही दिवसांपासून सिंहस्थ महाकुंभ सुरू आहे. येथे दररोज लाखो भाविक येतात. हा कुंभमेळा आयोजित करणार्‍या आयोजकांच्या क्षमतेविषयी आपण जगाला सांगायला नको का? असा सवालही त्यांनी केला.
पंतप्रधान मोदी यांचे आज सकाळी दिल्लीहून विशेष विमानाने इंदूर विमानतळावर आगमन झाले. येथे त्यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती सीरिसेना यांचे औपचारिक स्वागत केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28244

Posted by on May 15 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (352 of 2477 articles)


=एनआयएच्या तपासात झाला धक्कादायक खुलासा= नवी दिल्ली, [१४ मे] - जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) याचवर्षीच्या फेबु्रवारी महिन्यात आयोजित कार्यक्रमात भारतविरोधी ...

×