Home » क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या » सिंधूवर बक्षिसांच्या ‘श्रावणधारां’चा वर्षाव

सिंधूवर बक्षिसांच्या ‘श्रावणधारां’चा वर्षाव

rio-olympics-badminton-women_p v sindhuनवी दिल्ली, [२० ऑगस्ट] – रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला बॅडमिंटनच्या एकेरी गटात रौप्यपदक जिंकून देशाचा नावलौकिक वाढविणारी भारताची नवी फुलराणी पी. व्ही. सिंधूवर बक्षिसांच्या श्रावणधारांचा अक्षरश: वर्षाव सुरू असून, अनेक राज्य सरकारे आणि इतर संस्थांनी तिला विविध बक्षिसे जाहीर केली आहेत.
दिल्ली सरकारने सिंधूला २ कोटी रुपयांचे पारितोषिक देण्याची घोषणा केली आहे. आंध्रप्रदेश सरकारने तिला ३ कोटी रुपयांसह तमाम पुरस्कार देण्यासह सिंधूचे प्रशिक्षक गोपीचंद यांनाही ५० लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे.
बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने (बीएआय) सिंधूला ५० लाख रुपयांचा रोख पुरस्कार जाहीर केला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार विजेता व सिंधूचे प्रशिक्षक गोपीचंद यांनासुद्धा १० लाख रुपयांचा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. याशिवाय सिंधूला प्रथम श्रेणीची नोकरी व राज्याची नवी राजधानी अमरावती येथे १ हजार चौ. यार्डांचा भूखंडसुद्धा देणार आहे.
रिओत शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात विश्‍व क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेल्या सिंधूला अग्रमानांकित स्पेनच्या कॅरोलिना मारिनकडून पराभव पत्करावा लागला व सुवर्णाऐवजी तिला रौप्यपदक मिळाले. यापूर्वी २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये सायना नेहवालने कांस्यपदक मिळविले होते.
हैदराबादमध्ये पाय ठेवताच बीएमडब्ल्यू कार
हैदराबाद जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष व्ही. चामुंडेश्‍वरनाथ यांनी सिंधूने हैदराबाद येथे पाय ठेवताच महागडी बीएमडब्ल्यू कार भेट देण्याची घोषणा केली. यापूर्वी चामुंडेश्‍वरनाथ यांनी २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारी हैदराबादच्या सायना नेहवाललासुद्धा बीएमडब्ल्यू कार देऊन सन्मानित केले होते. आंध्र प्रदेश किंवा तेलंगणाच्या कोणत्याही खेळाडूने पदक जिंकल्यास त्याला बीएमडब्ल्यू कार भेट देईल, अशी घोषणा सचिन तेंडुलकरचे जिवलग मित्र चामुंडेश्‍वरनाथ यांनी रिओ ऑलिम्पिकच्या प्रारंभीच घोषणा केली होती.
तेलंगना सरकारकडून  एक कोटीचे बक्षीस
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रौप्यपदक विजेत्या सिंधूला १ कोटी रुपयांचा पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय देशातील अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तिच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल तिचे अभिनंदन केले आहे.
मध्यप्रदेश सरकार ५० लाख देणार
शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेश सरकारने सिंधूला ५० लाख व कुस्तीपटू साक्षी मलिकला २५ लाख रुपयांचा पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29246

Posted by on Aug 21 2016. Filed under क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या (108 of 2479 articles)


नवी दिल्ली, [२० ऑगस्ट] - ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि रिझर्व्ह बँकेचे विद्यमान डेप्युटी गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांची आज शनिवारी भारतीय ...

×