Home » आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप » स्पेनची मिरेया रोयो नवी मिस वर्ल्ड

स्पेनची मिरेया रोयो नवी मिस वर्ल्ड

=भारताच्या अदिती आर्याच्या पदरी निराशा=
Spain's Mireia Lalaguna Royo Wins Miss Worldसानया, [२० डिसेंबर] – स्पेनच्या मिरेया रोयोने चीनच्या सानया शहरात आयोजित मिस वर्ल्ड २०१५ स्पर्धेचा किताब पटकावला. या स्पर्धेत मिस रशियाने उपविजेतेपद मिळवले, तर मिस इंडोनेशियाने तिसरा क्रमांक पटकावला.
जगातील सर्वांत सुंदर महिलेचा किताब जिंकणारी २३ वर्षीय मिरेया रोयो स्पॅनिश मॉडेल आहे. किताब पटकावल्यानंतर रोयोने आपल्या सौंदर्याला साजेसेच वक्तव्य केले. ‘मी बाहेरून खूप सुंदर आहे याचा अर्थ आतून सुंदर नाही असा नाही’, असे ती म्हणाली. बार्सिलोना येथील असलेली रोयो इन्स्टाग्रामवरही खूप सक्रिय आहे.
‘शक्तिशाली महिलांवर विश्‍वास असल्याने मिस वर्ल्ड व्हावे अशी माझी इच्छा आहे. माझ्यामध्ये आतून असे काहीतरी आहे ज्यामुळे मी प्रत्येक गोष्ट सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करते. सौंदर्याचा काहीतरी हेतू असतो आणि हीच परंपरा पुढे नेण्याची माझी इच्छा आहे. एकदुसर्‍याची मदत करूनच आम्ही आनंद मिळवू शकतो’, असे रोयोने स्पर्धेचा अंतिम निकाल लागण्यापूर्वी म्हटले होते.
अदिती आर्या अपयशी
चीनच्या हैनान प्रांतातील ब्यूटी क्राऊन थिएटरमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार्‍या अदिती आर्याला अव्वल १० मध्येही स्थान मिळवता आले नाही. अदितीसह १०८ देशांच्या सौंदर्यवती या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. मार्च २०१५ मध्ये फेमिना मिस इंडिया वर्ल्ड हा किताब जिंकणार्‍या २२ वर्षीय अदिती आर्याला विश्‍व स्पर्धेत मात्र छाप पाडता आली नाही. स्कॉटलंड आणि नॉर्दन आयर्लंडच्या सुंदरींनी अव्वल १० मध्ये स्थान पटकावले. मानवाधिकारांच्या मुद्यावरून चीनवर टीका करणार्‍या मिस कॅनडाला स्पर्धेत प्रवेश देण्यास नकार देण्यात आल्यामुळेही ही स्पर्धा गाजली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26254

Posted by on Dec 21 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप (1000 of 2483 articles)


=५८ वर्षीय रुग्णाला मिळाले जीवदान= मुंबई, [२० डिसेंबर] - गेल्या काही वर्षांपासून अवयवदानाबाबत देशात जागृती निर्माण झाली असून, सूरत येथील ...

×