richwood
richwood
richwood
Home » छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र » ५ हजार कोटींच्या कामांचे ई-भूमिपूजन

५ हजार कोटींच्या कामांचे ई-भूमिपूजन

-• इकॉनॉमिक कॉरिडॉर रोजगाराचा राजमार्ग : मुख्यमंत्री
-• हेरिटेज टुरिझममुळे सेवाग्राम जागतिक नकाशावर
•- सिंदी (रेल्वे) ड्रायपोर्टमुळे आयात-निर्यातीला संधी,
वर्धा, २ ऑक्टोबर – ज्या ठिकाणी सुविधा असतात त्याच ठिकाणी जगातील उद्योजक येतात. वर्धा जिल्ह्यात ड्रायपोर्टच्या उभारणीतून हजारो उद्योग निर्माण होणार असून, सेवाग्राम विकास आराखड्यातून गांधींचा विचार जगात पोहोचणार आहे. एकीकडी कार्बोहब तयार होत असून, दुसरीकडे ड्रायपोर्ट उभारला जात आहे. रस्त्यांचे जाळे पोहोचते तिथेच समृद्धी पोहोचते. हा विकास रोजगार दूर करण्यासाठी राजमार्ग ठरेल. इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या निर्मितीमधून स्थानिक युवकांना रोजगार हे एकमेव ध्येय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सेवाग्राम येथील हावरे लेआऊट येथील हेलिपॅड मैदानावर सोमवारी सिंदी रेल्वे येथील ड्रायपोर्ट आणि सेवाग्राम विकास आराखड्यातील कामांसह विविध विकास कामांच्या ई-भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जा व पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, खासदार रामदास तडस, आ. समीर कुणावार, आ. पंकज भोयर, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, माजी खा. दत्ता मेघे, नगराध्यक्ष अतुल तराळे, सेवाग्रामच्या सरपंच रोशना जामलेकर, पवनारचे सरपंच राजेश्‍वर गांडोळे, विभागीय आयुक्तअनुपकुमार, माजी खा. विजय मुडे, जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, सुरेश वाघमारे, अविनाश देव, सुनील गफाट, जिल्हाधिकारी शैलेश नवाल उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, जिल्ह्यात विविध प्रकल्पांच्या माध्यमातून एकाच दिवशी ५ हजार कोटींच्या कामांना सुरुवात होत आहे. चौपदरी रस्ते, ड्रायपोर्टच्या माध्यमातून विदर्भातील उद्योगांना चालना मिळणार असून या विकासाला पूरक म्हणून सेवाग्राम विकासाचा २६६ कोटींचा आराखडा हाती घेण्यात आला आहे. ड्रायपोर्टची निर्मिती हे या परिसराला मिळालेले मोठे वरदान ठरणार आहे. या पोर्टच्या माध्यमातून सुविधा मिळणार असल्यामुळे विदर्भातील शेतकरी आणि उद्योजक आपला माल थेट विदेशात पाठवू शकतील. यामुळे आयात-निर्यातीला चालना मिळणार आहे.
नैसर्गिक कापूस उत्पादन : गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपले वर्धा जिल्ह्याकडे लक्ष असल्याचे अनेक दाखले दिले. जिल्ह्यातील सेलू, वर्धा आणि सिंदीरेल्वे येथील कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी व्हेसपर फाऊंडेशन या कंपनीला मदत करावी, अशी सूचना त्यांनी केली. ही कंपनी नैसर्गिक कापूस प्रक्रियेतून तयार होणार्‍या कापसापासून निघणार्‍या सुताचे टॉवेल तयार करते. त्यांना या तीनही ठिकाणच्या कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी मदत केल्यास शेतकर्‍यांना त्याचा लाभ होणार आहे. तसेच मदर डेअरीच्या माध्यमातून भविष्यात रोज २ लाख लिटर दूध संकलनाचा उद्देश आहे. यासाठी शेतकर्‍यांनी पुढाकार घेतल्यास शेतकरी आत्महत्या होणार नाही, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
राज्याला पर्यावरणयुक्त, आरोग्ययुक्त, जलयुक्त आणि व्यसनमुक्तीसोबतच रोजगारयुक्त करण्याचा संकल्प आम्ही केला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. यावेळी खा. रामदास तडस आणि मदन येरावार यांनी समयोचित मार्गदर्शन केले.
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी प्रास्ताविकातून ड्रायपोर्टबाबत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तांत्रिक सदस्य डी. ओ. तावडे यानी रस्ते प्रकल्प, तर विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी सेवाग्राम विकास आराखडाबाबत माहिती दिली.

Short URL: http://vrittabharati.in/?p=34992

Posted by on 9:20 pm. Filed under छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google