Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » ‘अग्नी-१’ची यशस्वी चाचणी

‘अग्नी-१’ची यशस्वी चाचणी

=७०० किमीची मारक क्षमता=
AGNI-3बालासोर, [१४ मार्च] – जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या आणि अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या ‘अग्नी-१’ या क्षेपणास्त्राची भारताने आज सोमवारी यशस्वी चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र ७०० किलोमीटरपर्यंत अचूक मारा करू शकते.
खास लष्कराकरिता असलेली ही चाचणी ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉ. अब्दुल कलाम द्वीपकल्पातील एकात्मिक चाचणी केंद्रातून सकाळी सव्वा नऊच्या सुमारास घेण्यात आली, अशी माहिती संरक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. भारतीय लष्कराच्या स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडतर्फे प्रशिक्षणाचा भाग म्हणून ही चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी आतापर्यंत उत्पादित क्षेपणास्त्रांपैकी एकाची सरसकट निवड करण्यात आली असून, चाचणी पूर्णपणे यशस्वी राहिली आहे, असे अधिकार्‍याने सांगितले.
या अत्याधुनिक क्षेपणास्त्राला ७०० किलोमीटर अंतरावर ठेवण्यात आलेल्या लक्ष्याचा भेद करण्यासाठी ९ मिनिटे आणि ३६ सेकंदाचा कालावधी लागला. या क्षेपणास्त्राच्या प्रवासमार्गाचे अत्याधुनिक रडार व नौदल जहाजांच्या सहाय्याने बारकाईने निरीक्षण करण्यात आले. १२ टन वजन आणि १५ मीटर लांबी असलेल्या ‘अग्नी-१’ क्षेपणास्त्रावरून एक टनपेक्षा जास्त वजनाची अण्वस्त्रे वाहून नेता येणे शक्य आहे. सोबतच, अण्वस्त्रांचे वजन कमी करून क्षेपणास्त्राचा पल्ला वाढविता येणेही शक्य आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27301

Posted by on Mar 14 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (666 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१४ मार्च] - एप्रिलमध्ये होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीत केरळमध्ये भाजपा हिंदू मतांच्या आधारावर सत्तारूढ युडीएफ डाव्या पक्षांच्या अनेक ...

×