Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » अधिवेशनानंतर कॉंग्रेसचा पर्दाफाश: श्रीकांत शर्मा

अधिवेशनानंतर कॉंग्रेसचा पर्दाफाश: श्रीकांत शर्मा

Shrikant Sharma bjpनवी दिल्ली, [१२ डिसेंबर] – कॉंग्रेसने देशाच्या विकासप्रक्रियेत अडथळा आणण्यासह गरिबांच्या हितावर कुठाराघात करणे थांबवले नाही, तर जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भाजपा प्रवक्ते श्रीकांत शर्मा यांनी आज शनिवारी येथे दिला.
११ अशोक रोड या भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत शर्मा म्हणाले की, कॉंग्रेस विकासाच्याच विरोधात नाही, तर देशातील गरिबांच्याही विरोधात आहे. नॅशनल हेरॉल्डप्रकरणी आपली चोरी पकडली गेल्यामुळे कॉंग्रेस गोंधळली आहे, त्यामुळे ती पंतप्रधान कार्यालयावर बिनबुडाचे आरोप करत आहे. कॉंग्रेसजवळ काही पुरावे असतील तर त्यांनी ते समोर आणावे, पण बिनबुडाचे आरोप करून पंतप्रधान कार्यालयाची प्रतिमा मलिन करू नये. कॉंग्रेसच्या कोणत्याही अपप्रचाराला जनता आता बळी पडणार नाही.
अधिवेशन संपल्यानंतर कॉंग्रेसच्या या गरीब आणि विकासविरोधी भूमिकेचा पर्दाफाश भाजपा जनतेत जाऊन करेल, असे स्पष्ट करत शर्मा म्हणाले की, लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून कॉंग्रेस अद्याप बाहेर आली नाही. कॉंग्रेस भ्रष्टाचाराच्या दलदलीत फसली आहे, नॅशनल हेरॉल्डच्या मुद्यावर कॉंग्रेसची चोरी पकडली गेल्यामुळे कॉंग्रेस संसदेत गोंधळ घालून सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणत आहे. चोर तर चोर, अन् वर शिरजोर, अशी कॉंग्रेसची भूमिका आहे.
गेल्या दीड वर्षाच्या काळात मोदी सरकारने विकासाची जेवढी कामे केली तेवढी कॉंग्रेसच्या राजवटीतही झाली नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेने लक्षणीय प्रगती केली आहे, याकडे लक्ष वेधत शर्मा म्हणाले की, देशातील प्रलंबित ८५ पैकी ६५ प्रकल्प आमच्या कार्यकाळात सुरू झाले आहेत.
कोळशाचे उत्पादन वाढले आहे. विजेच्या उत्पादनात ८.५ टक्के वाढ झाली आहे. संपुआच्या काळात देशातील १८ हजार गावे अंधारात होती, पण आम्ही सत्तेवर आल्यानंतर पहिल्या शंभर दिवसांत ३ हजार गावांत वीज पोहोचवली. एक हजार दिवसात उर्वरित सर्व गावांत वीज पोहोचवली जाणार आहे, असे शर्मा यांनी सांगितले. १०० गावांमध्ये एलईडी बल्बचा वापर करत सरकारने २१५०० मेगावॅट विजेची बचत केली आहे, असे ते म्हणाले.
अनेक विदेशी नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कर्तृत्वाची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. पण, कॉंग्रेस मात्र मोदींवर खोटेनाटे आरोप करत आहे. राहुल गांधी म्हणजे खोटे बोलण्याची मशिन असल्याचा आरोपही शर्मा यांनी केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26158

Posted by on Dec 13 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1024 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१२ डिसेंबर] - नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरून संसदेला वेठीस धरणारा कॉंगे्रस पक्ष आता चांगलाच अडचणीत आला आहे. कॉंगे्रसचे वरिष्ठ ...

×