Home » आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप » अनेकांनी घेतला सोशल मीडियाचा आधार

अनेकांनी घेतला सोशल मीडियाचा आधार

socialmedia1पॅरिस, [१४ नोव्हेंबर] – पॅरिस येथील अतिरेकी हल्ल्यानंतर एका रात्रीत होत्याचे नव्हते झालेल्या फ्रेंच नागरिकांनी आपले मित्र, आप्तेष्टांशी संवाद साधण्यासाठी आणि निवार्‍याच्या शोधार्थ सोशल मीडियाचा आधार घेतला.
शुक्रवारी रात्री पॅरिस येथे अनेक जण कॉन्सर्टचा आनंद घेत होते, तर काही जण फ्रान्स आणि जर्मनी यांच्यातील मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्याची मजा लुटत होते. इतक्यात काही कळायच्या आत अंदाधुंद गोळीबार आणि वेगवेगळ्या सहा ठिकाणी एकापाठोपाठ एक साखळी बॉम्बस्फोट झाले आणि फ्रेंच नागरिकांच्या आनंदाची रात्र एका क्षणात काळरात्र झाली.
या काळरात्रीमध्ये तब्बल १२० नागरिक मृत झाले, तर कित्येक जण जखमी झाले. कॉन्सर्ट हॉल आणि स्टेडियममध्ये जणू रक्ताचा पाटच वाहिला. या काळारात्रीनंतर उगवलेल्या दिवशी फ्रान्स नागरिकांनी आपले नातेवाईक वा मित्रपरिवाराच्या शोधार्थ, तसेच संदेशवहनाकरीता सोशल मीडियाचा आधार घेतला.
‘ बताक्लान कॉन्सर्ट हॉलमध्ये गेलेली आमची १७ वर्षीय लॉला जर कुणाला आढळली तर आमच्याशी संपर्क करा ‘
‘ माझा मित्र मला सापडत नाहीय्. मला मदत करा ‘ असे अनेक संदेश ट्विटर, फेसबुक वगैरे सोशल साईट्‌सवर वाचायला मिळत आहेत.
पॅरिसमधील हजारो नागरिकांनी, विशेषतः हल्ले झालेल्या भागातील नागरिकांनी #PorteOuverte अर्थात ‘ उघडे दार ‘ हा हॅशटॅग वापरून मदतीकरिता तत्पर असल्याचा संदेश दिला आहे. शुक्रवारच्या हल्ल्यानंतर ट्विटरवर वापरण्यात आलेल्या #fusillade  अर्थात ‘ शूटिंग‘ हा हॅशटॅग तब्बल ७ लाख वेळा वापरला गेला होता. त्याखालोखाल शनिवारी #PorteOuverte हा हॅशटॅग ४ लाख ८० हजार वेळा वापरण्यात आला आहे.
याशिवाय निवार्‍याच्या शोधार्थ फिरणार्‍या पॅरिसमधील नागरिकांना तत्काळ मदतीकरीता “porteouverte.eu” hr ही वेबसाईट सुरू करण्यात आली असून, फ्रान्समधील अनेक नागरिकांनी आपली घरेदखील मदतीकरीता खुली केली आहेत. त्याबद्दलचे पोस्टही ट्विटरवर टाकण्यात आले आहेत.
दरम्यान, फेसबुकने देखील पॅरिस टेरर अटॅक हे अधिकृत पेज सुरू करून मदतीचा हात पुढे केला आहे. तसेच त्यावरील छायाचित्रातील व्यक्ती जर सुरक्षित असतील तर ओके क्लिक करून तो संदेश सोशल करण्याची सोय देखील केली आहे. यामुळे असुरक्षित असलेल्यांची थेट माहिती अन्यत्र असलेल्या नातेवाईकांना वा आप्तेष्टांना कळणे अत्यंत सोयीचे झाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25438

Posted by on Nov 15 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप (1249 of 2458 articles)


नवी दिल्ली, [१४ नोव्हेंबर] - देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर २६/११ ला झालेल्या हल्ल्यासारखाचा सुनियोजित अतिरेकी हल्ला फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे ...

×