Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » अमेरिकेच्या वक्तव्यामुळे चीनचा थयथयाट

अमेरिकेच्या वक्तव्यामुळे चीनचा थयथयाट

=अरुणाचल प्रदेश भारताचे अविभाज्य अंग=
india-china-usबीजिंग, [४ मे] – भारतावर नेहमीच विषारी फूत्कार सोडणार्‍या ड्रॅगनने आपला मोर्चा आता महाशक्ती अमेरिकेकडे वळविला आहे. अमेरिकेने अरुणाचल प्रदेशाच्या मुद्यावरून भारताला दिलेल्या पाठिंब्यामुळे चीनचा चांगलाच जळफळाट झाला असून या मुद्यावरून अमेरिकेला स्पष्टीकरण मागण्याचे चीनने ठरविले असल्याची माहिती आहे. भारत-चीन सीमावादावर कुठल्याही तिसर्‍या देशाचा हस्तक्षेप या प्रकरणातील गुंतागुंत अधिक वाढविणारा ठरेल, असे चीनने म्हटले आहे.
अरुणाचल प्रदेश हे भारताचे अविभाज्य अंग आहे, असे स्पष्ट प्रतिपादन अमेरिकेचे महावाणिज्य दूत क्रेग. एस. हॉल यांनी इटानगर येथे केले होते, हे विशेष. चीनने अमेरिकेच्या या वक्तव्याची दखल घेतली असून याविषयीच्या सतत्येविषयी अमेरिकेला स्पष्टीकरण मागण्यात येईल, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे लेखी निवेदन देताना सांगण्यात आले. मात्र, अमेरिकेचे हे विधान तथ्याला धरून नाही, असेही चीनने म्हटले आहे.
अमेरिकेचे महावाणिज्य दूत क्रेग. एल. हॉल यांनी २८ एप्रिल रोजी अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर येथे मुख्यमंत्री कलिखो पुल यांची भेट घेतली होती. ‘अमेरिकन सरकारचे धोरण अतिशय स्पष्ट आहे, अरुणाचल प्रदेश भारताचे अविभाज्य अंग आहे’, असे हॉल यांनी कलिखो पुल यांच्याशी चर्चा करताना स्पष्टपणे नमूद केले होते.
मात्र, या वक्तव्याने चीनचा चांगलाच जळफळाट झाला आहे. अरुणाचल प्रदेश म्हणजे ‘दक्षिण तिबेट’ असल्याचा चीनचा दावा आहे. ‘चीन आणि भारत समंजस आहेत. आपसातील वाद संपुष्टात आणण्यात आणि दोन्ही देशातील नागरिकांचे दीर्घकालीन हित जपण्यात ते सक्षम आहेत,’ असे चीनने म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28176

Posted by on May 5 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (379 of 2458 articles)


नवी दिल्ली, [४ मे] - गेल्या ९ फेबु्रवारी रोजीच्या कार्यक्रमात अफजल गुरूला श्रद्धांजली वाहताना भारतविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी करण्यात आलेल्या कठोर ...

×