Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » अय्यर, खुर्शीद यांचे वक्तव्य देशद्रोही

अय्यर, खुर्शीद यांचे वक्तव्य देशद्रोही

=सोनियांनी माफी मागावी: व्यंकय्या नायडू यांची मागणी=
Venkaiah-Naidu2नवी दिल्ली, [१८ नोव्हेंबर] – पाकिस्तानला खुश करण्यासाठी त्या देशाच्या भूमीत जाऊन भारत आणि भारत सरकारविरोधात गरळ ओकणारे कॉंगे्रसचे नेते सलमान खुर्शीद आणि मणिशंकर अय्यर यांचे वक्तव्य म्हणजे देशद्रोहच असून, कॉंगे्रस पक्षाने या दोन्ही नेत्यांविरोधात कठोर कारवाई करायला हवी आणि ते कॉंगे्रसचे नेते असल्याने, पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी यासाठी देशाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी आज बुधवारी केली.
नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावरून हटविल्याशिवाय भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुरळीत होऊ शकत नाही, असे वक्तव्य मणिशंकर अय्यर यांनी अलीकडेच पाकच्या दुनिया टीव्हीशी बोलताना व्यक्त केले होते. तर, त्याआधी सलमान खुर्शीद यांनी, भाजपा सरकारच्या पाकविरोधी धोरणामुळेच उभय देशांमधील संबंधात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ वारंवार भारताकडे मैत्रीचा हात पुढे करतात. पण, नरेंद्र मोदी तो वारंवार नाकारत आहेत, अशी गरळ ओकली होती.
या दोन्ही नेत्यांची वक्तव्ये अत्यंत आक्षेपार्ह आणि राष्ट्रविरोधी आहेत. हा एकप्रकारचा देशद्रोहच आहे. भारतविरोधी दहतशवादी कारवायांना सातत्याने प्रोत्साहन देणार्‍या आणि हजारो निष्पाप भारतीयांचे बळी घेणार्‍या पाकच्या भूमीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेतून उलथून फेका, असे वक्तव्य करणे हा सर्वांत मोठा देशद्रोह आहे, असे नायडू यांनी एका कार्यक्रमाच्या अनुषंगाने पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कॉंग्रेसप्रणीत संपुआ सरकारच्या हाती देश सुरक्षित नसल्याचे सिद्ध झाल्यानंतर देशवासीयांनी प्रचंड मताधिक्यासह सत्तेची सूत्रे नरेंद्र मोदी यांच्या हातात सोपविली आहे. नरेंद्र मोदी यांच्या प्रभावी कामगिरीमुळेच जगात आज भारताची प्रतिमा उंचावली आहे. देशाचा आर्थिक विकासही अतिशय वेगाने सुरू आहे. पाकिस्तानसह सर्वच शेजारी देशांसोबत चांगले संबंध ठेवण्याची आमच्या सरकारची इच्छा आहे. पण, राष्ट्राभिमान गहाण ठेवून आम्हाला ते संबंध नको आहेत, असेही नायडू यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25549

Posted by on Nov 18 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1215 of 2453 articles)


=डाळींचे भाव उतरण्याची शक्यता= नवी दिल्ली, [१८ नोव्हेंबर] - सुमारे ५३६६ टन इतका जप्त साठा बाजारात आल्याने डाळींचे भाव उतरण्याची ...

×