richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » अरुणाचल मुद्यावरून राज्यसभेत गदारोळ

अरुणाचल मुद्यावरून राज्यसभेत गदारोळ

नवी दिल्ली, [१८ डिसेंबर] – अरुणाचल प्रदेशच्या मुद्यावरून राज्यसभेत आजही गदारोळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज चारवेळा आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करावे लागले.
आज राज्यसभेच्या कामकाजाला प्रारंभ होताच कॉंग्रेसचे सदस्य घोषणा देत वेलमध्ये आले. अरुणाचलच्या राज्यपालांना परत बोलावण्याची कॉंग्रेसची मागणी होती. विशेष म्हणजे आज कॉंग्रेसच्या सदस्यांना पाठिंबा देण्यासाठी तृणमूल कॉंग्रेस, जदयु, समाजवादी पार्टी आणि डाव्या पक्षांसोबतसोबत अण्णाद्रमुकचे सदस्यही घोषणा देत वेलमध्ये आले.
आज सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ होताच कॉंग्रेसचे सदस्य घोषणा देत वेलमध्ये आले. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद उभे झाले आणि त्यांनी अरुणाचलच्या मुद्यावर आपण स्थगनप्रस्ताव दिला आहे, त्याचे काय झाले, अशी विचारणा केली. पाच दिवसांपासून या मुद्यावर सभागृहात कोणतेही कामकाज होत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. अरुणाचलमधील राजकीय पेचप्रसंगासाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत या मुद्यावर सभागृहात चर्चा घेण्याची मागणीही आझाद यांनी केली. अरुणाचलच्या राज्यपालांनी जे केले, तसे आधी देशात राष्ट्रपतींनी आणि कोणत्याही राज्याच्या राज्यपालांनी केले नाही, अरुणाचल प्रदेशमध्ये घटनेतील तरतुदींचे घोर उल्लंघन करण्यात आल्याचा आरोपही आझाद यांनी केला. गुलाम नबी आझाद बोलत असताना कॉंग्रेसच्या सदस्यांची घोषणबाजी सुरूच होती. तुमचा प्रस्ताव सभापतींच्या विचाराधीन आहे, असे उपसभापती पी. जे. कुरियन यांनी म्हटले. आझाद यांच्या बोलण्यावर वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणी न्यायालयाने काही आदेश दिला आहे. त्यामुळे आपल्याला या मुद्यावर चर्चा करता येणार नाही, याकडे लक्ष वेधत जावडेकर म्हणाले की, तसेही चर्चेची मागणी करणारा प्रस्ताव सभापतींच्या विचाराधीन आहे, त्यामुळे आताच हा मुद्दा चर्चेला घेता येणार नाही. तुमचा युक्तिवाद योग्य असल्याचे कुरियन यांनी म्हटले. जोपर्यंत सभापती आपल्याला परवानगी देत नाही, तोपर्यंत आपल्याला या मुद्यावर चर्चा करता येणार नाही, असे कुरियन यांनी स्पष्ट केले. वाहिन्यांवर या मुद्यावर चर्चा होऊ शकते, मग सभागृहात चर्चा का होऊ शकत नाही, अशी विचारणा आझाद यांनी केली. यावर के. सी. त्यागी, व्ही. पी. सिंह बदनोरे आणि अन्य सदस्य बोलायला उभे झाले. त्यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सदस्यांना शांत करण्याचे आणि आपल्या जागेवर जाण्याचे आवाहन कुरियन वारंवार करत होतेे, पण सदस्य त्याला प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे कुरियन यांनी सभागृहाचे कामकाज स्थगित केले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर याच गोंधळाची पुनरावृत्ती झाली. त्यामुळे अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत स्थगित केले.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26211

Posted by on 4:38 pm. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google