richwood
richwood
richwood
Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » अल्पवयीन दोषीच्या सुटकेला केंद्राचा विरोध : रिजिजू

अल्पवयीन दोषीच्या सुटकेला केंद्राचा विरोध : रिजिजू

=निर्भया बलात्कार प्रकरण=
Kiran Rijijuनवी दिल्ली, [२० डिसेंबर] – देशासह जगभरात गाजलेल्या राजधानी नवी दिल्ली येथील निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील अल्पवयीन दोषीची सुटका करण्यास केंद्र सरकारने विरोध केला असून, दिल्ली उच्च न्यायालयाने त्याच्या सुटकेचा आदेश दिला असल्याचे स्पष्ट केले आहे.
निर्भया प्रकरणातील अल्पवयीन दोषीची सुटका करण्याच्या मुद्यावरून देशभरात चर्चा रंगली असतानाच केंद्राने हे स्पष्टीकरण दिले आहे. सध्याच्या घडीला अल्पवयीन दोषीची सुटका करण्याला आमचा तत्त्वत: विरोध आहे आणि दिल्ली उच्च न्यायालयासमोर आम्ही ही बाब स्पष्टही केली आहे, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी सांगितले. अतिरिक्त सॉलिसिटर जनरलनी न्यायालयात केंद्राची बाजू मांडली, असे सांगतानाच यासंबंधीच्या कायद्यात सुधारणा करणारे विधेयक लोकसभेत पारित झाले असले तरी कॉंग्रेसच्या गदारोळामुळे राज्यसभेत ते पारित होऊ शकले नाही, असे रिजिजू यांनी सांगितले.
अल्पवयीन दोषीची मुक्तता झाल्यानंतर त्याच्या पुनर्वसनाची योजना तयार करा, असे निर्देश न्यायालयाने बालहक्क आयोग आणि दिल्ली सरकारला दिले आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या सरकारने त्याच्या पुनर्वसनाची योजना तयार करावी, असाच त्याचा अर्थ आहे, असेही रिजिजू म्हणाले.
सध्याच्या कायद्यातील तरतुदीनुसार निर्भया प्रकरणातील अल्पवयीन दोषीने तीन वर्षांची शिक्षा पूर्ण केल्यानंतर आज रविवारी त्याची सुटका होणार आहे. मात्र, निर्भयाच्या मातापित्यासह कार्यकर्त्यांनी त्याच्या सुटकेला विरोध केला. दिल्ली महिला आयोगाने यासंदर्भात शनिवारी रात्री उशिरा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु, तातडीने सुनावणी करण्यास नकार देत उद्या सोमवारी यावर सुनावणी करण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने दर्शविली आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26239

Posted by on 1:45 pm. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google