Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » आजपासून होणार संसदेचा आखाडा?

आजपासून होणार संसदेचा आखाडा?

=असहिष्णुता, जीएसटी गाजणार=

sansad bhavanनवी दिल्ली, [२९ नोव्हेंबर] – संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे पहिले दोन दिवस संविधान आणि घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष चर्चेत पार पडल्यानंतर, उद्या सोमवारपासून संसदेचा आखाडा करण्यासाठी विरोधक सज्ज झाले आहेत. देशातील असहिष्णुतेच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी अनेक राजकीय पक्षांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना नोटिसा दिल्या आहेत. दुसरीकडे, विरोधकांचा हल्ला झेलतानाच आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेले वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयक पारित करण्यासाठी सरकारनेही कंबर कसली आहे.
राज्यसभेत असहिष्णुतेवर चर्चा घडवून आणण्यासाठी कॉंगे्रस आणि जदयुने, तर लोकसभेत कॉंगे्रस आणि माकपने मतदानाची तरतूद नसलेल्या, पण प्रश्‍नतास स्थगित करणार्‍या नियम १९३ अंतर्गत अशाच प्रकारची नोटीस दिली आहे. याशिवाय, तृणमूल कॉंगे्रस, भाकप आणि अन्य पक्षांनीही आपापल्या नोटिसा दिल्या आहेत. लोकसभेतील नोटीस सोमवारसाठीच असून, राज्यसभेत या आठवड्यात केव्हाही चर्चेची मागणी करण्यात आली आहे.
गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले. गुरुवारी आणि शुक्रवारी संविधान आणि डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष पण, तितकीच वादळी चर्चा झाली होती. आता उद्या सोमवारपासून संसदेच्या खर्‍या कामकाजाला सुरुवात होत आहे. विरोधकांच्या मुद्यावर सरकार कोणती भूमिका घेते, असहिष्णुतेवर चर्चेची मागणी मान्य होते काय, यावरच दोन्ही सभागृहांमधील कामकाजाचे भवितव्य ठरणार आहे. असहिष्णुतेवर चर्चा करण्यासोबतच, वादग्रस्त वक्तव्ये करणार्‍या केंद्रातील काही मंत्र्यांविरोधात कारवाई करण्याची मागणीही विरोधक उचलून धरणार आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=25866

Posted by on Nov 30 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1111 of 2450 articles)


=मुंबईत लागणार १२५० सीसीटीव्ही कॅमेरे= मुंबई, [२९ नोव्हेंबर] - येथील सुरक्षितता अधिक भक्कम करण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था राखणे, वाहतुकीचे नियंत्रण ...

×