Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » आता घरपोच गॅस सिलेंडरसाठी ऑनलाईन पैसे भरा

आता घरपोच गॅस सिलेंडरसाठी ऑनलाईन पैसे भरा

gas_cylinderनवी दिल्ली, [२९ नोव्हेंबर] – एलपीजी गॅस सिलेंडरधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. आता घरपोच गॅस सिलेंडरसाठी ऑनलाईन पैसे भरण्याची सुविधा कंपन्यांतर्फे सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे घरी गॅस घेऊन आलेल्या डिलिव्हरी बॉयकडे पैसे देण्याची गरज भासणार नाही.
भारतीय तेल कंपन्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गॅस सिलेंडर बुकिंगसाठी आता स्मार्टकार्डची सुविधा सुरू करण्यात येणार असून, त्याची अंमलबजावणीही येत्या दोन महिन्यांत होणार आहे. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरशनच्या ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येईल.
या सुविधेनुसार ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी mylpg.in वर नवीन अकाऊंट सुरू करावे लागणार आहे. त्यावर गॅस बुकिंग आणि पेमेंट केल्यानंतर ग्राहकाला एक व्हाऊचर मिळेल. त्याचबरोबर गॅस एजन्सीकडे नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एक मेसेजही येईल. या सुविधेमुळे डिलिव्हरी बॉयला आता चिल्लरच्या नावाखाली जास्त पैसे देण्याच्या भानगडीतून ग्राहकांची सुटका होणार आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=25849

Posted by on Nov 30 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1117 of 2450 articles)


=हवाई दल प्रमुखांचे आश्‍चर्यकारक वक्तव्य= हाशिमरा, [२९ नोव्हेंबर] - भारताने चीनकडे शत्रू म्हणून पाहणे थांबवावे. दोन्ही देशांची उदिष्टे समान असल्याने ...

×