richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » आता टोल नाक्यांवरील रांगांपासून दिलासा

आता टोल नाक्यांवरील रांगांपासून दिलासा

नवी दिल्ली, २ सप्टेंबर – देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर शुक्रवारपासून फास्टॅग लेन सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांना आता टोल नाक्यांवरच्या रांगेत थांबण्याची गरज नाही. तुम्ही तुमचा प्रवास आता न थांबता सुसाट करू शकता.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात् एनएचएआयने इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन प्रणालीमध्ये पहिले यश मिळवले आहे. शुक्रवारपासून सर्व टोल नाक्यांवर फास्टॅग लेन चालू करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारक आता न थांबता प्रवास करू शकतात, असे रस्ते परिवहन मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे.
फास्टॅग हा आरएफआयडी टॅग आहे. बँकांच्या माध्यमातून ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने ही सेवा उपलब्ध आहे. हजारो वाहनधारकांनी गेल्या दोन दिवसात फास्टॅग लेनसाठी ऍप डाऊनलोड केले असल्याचे रस्ते परिवहन मंत्रालयाने म्हटले आहे. दरम्यान, ३१ ऑगस्ट २०१७ पर्यंत फास्टॅगची संख्या १८ टक्क्यांनी वाढली आहे. सरकारने १ ऑक्टोबर २०१७ पासून विक्री केल्या जाणार्‍या सर्व वाहनांवर फास्टॅग असणे अनिवार्य केले आहे. (वृत्तसंस्था)

Short URL: http://vrittabharati.in/?p=34880

Posted by on 8:38 pm. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google