richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, वाणिज्य » आता येणार टाटा मेगापिक्सल

आता येणार टाटा मेगापिक्सल

=१ लिटरमध्ये १०० किमी मायलेज देणारी=
Tata Megapixel  Frontपुणे, [२८ डिसेंबर] – टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या वाढदिवसानिमित्ताने (२८ डिसेंबर) टाटा कंपनी सामान्य जनतेसाठी टाटा मेगापिक्सल ही नवीन कार बाजारात आणत आहे. नॅनोच्या यशस्वी प्रकल्पानंतर येणारी ही नवीन कार १ लिटरमध्ये तब्बल १०० किलोमीटर धावणार आहे.
रतन टाटा हे मोठ्या समूहाचे उद्योगपती असले तरी, मध्यमवर्गीयांना परवडेल अशी कार बनविण्याचे स्वप्न त्यांनी नेहमीच पाहिले होते. त्यांच्या आग्रहाखातरच ही आकर्षक भेट ग्राहकांना मिळणार आहे. नॅनोपेक्षाही काही ऍडव्हान्स फीचर्स यामध्ये देण्यात आले आहेत.
चार सीटरची ही कार असून, पर्यावरणाला अत्यंत अनुकूल अशी गाडी असणार आहे. एका किलोमीटरमागे केवळ २२ ग्रॅम एवढा कार्बन डायऑक्साईड गाडीतून बाहेर पडतो. रतन टाटा यांनी ही कार ८२ व्या जिनेव्हा मोटर शोमध्ये सादर केली.
टाटा मेगापिक्सेल ही कार पुढील वर्षभरात बाजारत येण्याची शक्यता असून, ५ ते ६ लाख रुपयात ती उपलब्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26282

Posted by on 9:49 pm. Filed under ठळक बातम्या, वाणिज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google