Home » कला भारती, ठळक बातम्या » आपल्यालाही हेपेटायटीस बी ची लागण

आपल्यालाही हेपेटायटीस बी ची लागण

=अमिताभ बच्चन यांचा गौप्यस्फोट=
amitabh_bachanनवी दिल्ली, [२४ नोव्हेंबर] – आपले यकृत आता केवळ २५ टक्केच कार्यरत असून आपल्याला हेपेटायटीस बीची लागण झाली असल्याचा गौप्यस्फोट महानायक अमिताभ बच्चन यांनी केला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे चालवल्या जाणार्‍या हेपेटायटीस बी विरोधी मोहिमेचे ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून बच्चन यांच्या नियुक्ती कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी हा धक्कादायक खुलासा केला.
१९८२ मध्ये कुली चित्रपटाच्या शूटींगदरम्यान झालेल्या अपघातात जबर रक्तस्त्राव झाल्याने अमिताभ यांना सुमारे २०० जणांनी एकून ६० बाटल्या रक्तदान केले होते. त्यांपैकी कुणीएक व्यक्ती हेपेटायटीस बी ग्रस्त होता. त्यामुळे त्याच्याकडून या रोगाची लागण आपल्यालाही झाली मात्र याबाबत आपल्लायला २००० साली म्हणजे तब्बल १८ वर्षांनंतर कळलं असे ते यावेळी म्हणाले.
स्वतःच्या यकृताची स्थिती वर्णन करताना त्यांनी आता आपले यकृत ७५ टक्के निकामी झाले असून आता केवळ उरलेल्या २५ टक्के भागावरच आपण आयुष्य जगत असल्याचे त्यांनी सांगितले व उपस्थितांना हेपेटायटीस बी ची लस घेणे अत्यावश्यक असल्याचे सांगत प्रबोधन केले. तसेच उपचाराने या आजारावर मात करता येणे शक्य असल्याचेही त्यांनी येथे आवर्जून सांगितले.

Short URL: http://vrittabharati.in/?p=25695

Posted by on Nov 24 2015. Filed under कला भारती, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कला भारती, ठळक बातम्या (1160 of 2454 articles)


=लालू भेटीवर अण्णांचा हल्ला= राळेगणसिद्धी, [२४ नोव्हेंबर] - बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या शपथविधी सोहळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व राजदचे ...

×