Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » आमदारांचे वेतन पंतप्रधानांपेक्षाही जास्त

आमदारांचे वेतन पंतप्रधानांपेक्षाही जास्त

=आम आदमी पार्टी झाली खास, ४०० टक्क्यांची वाढ सुचविणारे विधेयक मंजूर=
Kejriwalनवी दिल्ली, [४ डिसेंबर] – स्वत:ला आम आदमी म्हणवून घेणार्‍या आणि सर्वसामान्य जनताच सर्वतोपरी असल्याची भाषा बोलणार्‍या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचा प्रत्येक आमदार आता ‘खास’ झाला आहे. सर्वसामान्य जनतेला वार्‍यावर सोडून केवळ आमदारांचे वेतन ४०० पटीने वाढविणार्‍या केजरीवाल सरकारच्या विधेयकाला गुरुवारी सायंकाळी दिल्ली विधानसभेने मंजुरी दिली. यामुळे दिल्लीतील आमदारांचे वेतन पंतप्रधानांपेक्षाही जास्त झाले आहे.
आतापर्यंत ८८ हजार रुपये मासिक वेतन घेत असलेल्या दिल्लीतील आमदाराला आता चक्क २.१० लाख रुपये वेतन मिळणार आहे. आमदारांचे मूळ वेतन १२ हजार रुपये इतके होते. ते आता ४८ हजार रुपये झाले आहे. वेतनासोबतच विविध भत्ते आणि निवृत्ती वेतनातही या विधेयकामुळे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आमदारांसोबतच मंत्र्यांच्या वेतनातही मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंत २० हजार रुपये मूळ वेतन असलेल्या मंत्र्याला आता चक्क ८० हजार रुपये मूळ वेतन मिळणार आहे. त्यांच्या वेतनात दरवर्षी दहा टक्के वाढ सुचविण्याच्या तरतुदीलाही सभागृहाची मान्यता मिळाली आहे.
देशात कुठेही भेट देण्यासाठी दिल्लीच्या आमदाराला प्रवास भत्ता मिळत होता. पण, आता देशाबाहेर जाण्यासाठीही प्रवास भत्ता मिळणार आहे. आमदारांसोबतच, विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्याच्या वेतनातही मोठी वाढ करण्यात आली आहे.
युवा कॉंगे्रसची निदर्शने
दरम्यान, या वेतनवाढीला विरोध करून, भाजपा आमदारांनी गुरुवारी सभात्याग केला होता. तर, आज शुक्रवारी युवा कॉंगे्रसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार निदर्शने केली. आम आदमीचा बुरखा धारण करणार्‍या केजरीवाल सरकारचा खरा चेहरा आता उघड झाला आहे, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25997

Posted by on Dec 5 2015. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (1079 of 2452 articles)


=मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांची माहिती= मुंबई, [२ डिसेंबर] - अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना मदत करण्यात राज्य सरकारने आघाडी ...

×