Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » आयएसआयची ‘हेर’गिरी असफल

आयएसआयची ‘हेर’गिरी असफल

=बीएसएफच्या हेड कॉन्स्टेबलसह दोघांना अटक=
pakistani-terrorist-isiनवी दिल्ली, [२९ नोव्हेंबर] – उत्तरप्रदेशच्या एटीएसने दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानी आयएसआयच्या हस्तकाला अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी आयएसआयच्या हेरगिरी रॅकेटचा भंडाफोड करताना, सीमा सुरक्षा दलातील हेड कॉन्स्टेबलसह दोघांना राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित महत्त्वाचे दस्तावेज आयएसआयला पुरविण्याच्या आरोपाखाली अटक केली. शासकीय गोपनीय कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली.
अब्दुल रशीद आणि कैफितुल्ला खान उर्फ मास्टर राजा अशी या आयएसआयच्या हेरांची नावे असून, यातील रशीद हा बीएसफएफच्या राजौरी येथील गुप्तचर विभागात तैनात होता. तर, कैफितुल्ला राजौरीच्या एका शाळेतील ग्रंथालयात काम करीत होता. गुप्तचरांकडून माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी दोघांच्याही हालचालींवर बारीक नजर ठेवली होती. त्यांच्या आणखीही काही साथीदारांना अटक करण्यासाठी व्यापक धाडसत्र राबविण्यात येत आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेतील साहाय्यक पोलिस आयुक्त के. पी. एस. मल्होत्रा यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
अटकेनंतर उभयतांची झडती घेतली असता, त्यांच्याजवळून राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अनेक महत्त्वाचे दस्तावेज ताब्यात घेण्यात आले, असे मल्होत्रा यांनी सांगितले. कैफितुल्ला हा पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्हचा सक्रिय सदस्य असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. कैफितुल्लाने २६ नोव्हेंबर रोजी जम्मूहून भोपाळकडे जाणारी ट्रेन पडकली होती. त्याच्या हालचालींबाबतची माहिती गुप्तचरांकडून मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने सांगितले की, आपण २०१३ मध्ये पाकला गेलो होतो आणि तिथेच आयएसआयच्या संपर्कात आलो. आयएसआयमधील अधिकार्‍यांनी आपल्याला भरपूर पैशाचे आमिष दाखविले आणि भारतीय सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती पुरविण्याचा करार केला. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी मी बीएसएफ आणि लष्करात आपली ओळख वाढविण्यास सुरुवात केली. आतापर्यंत ई-मेल आणि व्हॉट्‌स ऍपवरून काही महत्त्वाची माहिती आपण आयएसआयला पाठविली असल्याची कबुलीही त्याने दिली. विशेष म्हणजे, बीएसएफमध्ये हेड कॉन्स्टेबल असलेला अब्दुल रशीद हा त्याचा जवळचा नातेवाईक आहे. कैफितुल्लाने त्यालाही पैशाचे आमिष दाखविले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25868

Posted by on Nov 30 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1113 of 2453 articles)


=असहिष्णुता, जीएसटी गाजणार= नवी दिल्ली, [२९ नोव्हेंबर] - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे पहिले दोन दिवस संविधान आणि घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब ...

×