richwood
richwood
richwood
Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » आयएसआयचे काम इसिससारखेच

आयएसआयचे काम इसिससारखेच

=पाकी एजंट ऐजाजची धक्कादायक कबुली, खोटी वचने देऊन तरुणांची दिशाभूल केली जाते=
pakistani-terrorist-isiबरेली, [३० नोव्हेंबर] – पाकिस्तानची गुप्तचर संस्था असलेल्या आयएसआयचे काम जगभरात क्रौर्याची सीमा ओलांडत असलेल्या इसिस या जहाल दहशतवादी संघटनेसारखेच आहे. तरुणांची दिशाभूल करणे, त्यांना मोठमोठे आमीष दाखविणे आणि या मोबदल्यात त्यांच्याकडून दहशतवादी कृत्ये करून घेणे, हेच आयएसआयचे मुख्य कार्य आहे, अशी धक्कादायक कबुली पाकसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला आयएसआयचा हस्तक मोहम्मद ऐजाज याने दिली.
भारतात घुसखोरी करण्यासाठी आयएसआयने मला बांगलादेशात पाठविले. तिथे, आयएसआयच्या काही बड्या नेत्यांनी माझे पासपोर्ट आपल्या ताब्यात घेतले आणि नदीमार्गे भारतात पाठविले. इसिसदेखील नव्याने भरती झालेल्या तरुणांचे पासपोर्ट जाळून टाकते आणि नंतर त्यांना दहशतवादी कारवायांच्या मोहिमेवर पाठवते, असे त्याने तपास अधिकार्‍यांना चौकशीत सांगितले.
भारतविरोधी कारवाया करण्यासाठी मला प्रोत्साहित करताना आयएआयमधील अधिकार्‍यांनी माझ्या बहिणीचा विवाह आणि घरातील सदस्यांना आयुष्यभर पुरेल इतका पैसा देण्याचे वचन दिले होते. ५० हजार रुपये महिना ते माझ्या कुटुंबीयांना देणार होते. तीन वर्षे लोटली, पण अद्याप कोणतेही वचन पूर्ण झाले नाही. तरुणांची दिशाभूल करणे, त्यांना मोठमोठी वचने देणे आणि काम काढून घेणे हेच आयएसआयचे धोरण असल्याचे तो म्हणाला.
उत्तरप्रदेशच्या विशेष कृती दलाचे प्रमुख अमित कुमार यांच्य मते, ऐजाजला आयएसआयने नऊ महिने दहशतवादाचे प्रशिक्षण दिले होते. कोणतेही दहशतवादी कृत्य करण्यासाठी तो परिपूर्ण झाल्यानंतरच त्याला भारतविरोधी कारवायांसाठी पाठविण्यात आले होते. आता तो केवळ सहानुभूती मिळविण्यासाठी आपल्या कुटुंबीयांच्या आर्थिक स्थितीबाबत बोलत आहे. त्याला पाच भाऊ आणि तीन बहिणी आहेत. यातील एक भाऊ पाकिस्तानमधील ब्रिटीश उच्चायोगात कार्यरत आहे. ऐजाज हा संगणक तज्ज्ञ असून, तो जेव्हा पाकमधील आपल्या म्होरक्यांसोबत बोलायचा, तेव्हा तो मोठ्या शिफातीने स्काईप सुरू करायचा आणि अनेक तासपर्यंत आपल्या म्होरक्यांशी बोलायचा. स्काईपवरून होणारे संभाषण रेकॉर्ड करता येत नाही, याची त्याला चांगली माहिती होती. त्यामुळे आम्ही त्याच्या मागावर असतानाही, त्याचे संभाषण रेकॉर्ड करणे आम्हाला कधीच शक्य झाले नाही, असेही त्यांनी सांगितले.

Short URL: http://vrittabharati.in/?p=25899

Posted by on 2:50 pm. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google