Home » आंतरराष्ट्रीय, आफ्रिका, ठळक बातम्या » आयव्हरी कोस्टवर अल् कायदाचा हल्ला, १६ ठार

आयव्हरी कोस्टवर अल् कायदाचा हल्ला, १६ ठार

ivory-coast-hotel-attackग्रॅण्ड बस्सम, [१४ मार्च] – आयव्हरी कोस्टच्या ग्रॅण्ड बस्सम किनार्‍यावरील एका रिसॉर्टवर दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात १६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याची जबाबदारी अल् कायदा या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.
ग्रेनेड आणि असॉल्ट रायफल्सने सज्ज असलेल्या दहशतवाद्यांनी व्यावसायिक केंद्र आबिदजानपासून पूर्वेकडे सुमारे ४० किमी अंतरावर असलेल्या ग्रॅण्ड बस्सममधील रिसॉर्टच्या तीन हॉटेल्समध्ये हल्ला केला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी जेव्हा समुद्रकिनार्‍यावर गोळीबार सुरू केला, तेव्हा लोकांमध्ये एकच दहशत निर्माण झाली होती. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, त्याने एका हल्लेखोराला अला हो अकबर अशी आरोळी देताना ऐकले.
लेबनानमधील एक विक्रेता अब्बास अल् रोजने सांगितले की, त्याने एका हल्लेखोराला दुरून पाहिले. त्याच्याजवळ कलाश्‍नकोव आणि ग्रेनेड बेल्ट होता. तो लोकांना शोधत होता. प्रत्यक्ष हल्ला झाला, तेव्हा हा विक्रेता हॉटेलमधील एका पूलमध्ये लपला होता.
आयव्हरी कोस्टचे राष्ट्राध्यक्ष अलासान औतारा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात १६ जणांना आपला जीव गमवावा लागला असून, त्यामध्ये दोन सैनिकांचाही समावेश आहे.
या हल्ल्यात मरण पावलेल्यांमध्ये फ्रान्स आणि जर्मनीतील प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश असल्याचे आयव्हरी कोस्टचे गृहमंत्री हामेद बाकायोको यांनी स्पष्ट केले.
अमेरिका आणि फ्रान्सने हल्लेखोरांना पकडण्यासाठी मदत करण्याचे आश्‍वासन दिले असून, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. अमेरिकेतील एसआयटीई या गुप्तचर यंत्रणेनुसार, अल् कायदा इन द इस्लामिका मघरेबने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. ही संघटना अल् कायदाचीच उत्तर आफ्रिकी संघटना असल्याचे यंत्रणेने स्पष्ट केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27304

Posted by on Mar 15 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आफ्रिका, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आफ्रिका, ठळक बातम्या (668 of 2458 articles)


=७०० किमीची मारक क्षमता= बालासोर, [१४ मार्च] - जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या आणि अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या ‘अग्नी-१’ या ...

×