Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » आरबीआयमधील संपामुळे बँकिंग सेवा प्रभावित

आरबीआयमधील संपामुळे बँकिंग सेवा प्रभावित

RBI GATEमुंबई, [१९ नोव्हेंबर] – केंद्र सरकारने हाती घेतलेल्या सुधारणांना विरोध आणि निवृत्तीनंतर अधिक लाभ मिळावा, या मागणीसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुमारे १७ हजार अधिकारी, कर्मचार्‍यांनी आज गुरुवारी एक दिवसाची सामूहिक रजा घेत आंदोलन केल्यामुळे देशभरातील बँकिंग सेवांवर विपरित परिणाम झाला.
या संपामुळे धनादेश वटविणे, देणी आणि विदेशी विनिमय व्यवहारांवर परिणाम झाला. गेल्या सहा वर्षांत आरबीआयच्या कर्मचार्‍यांनी केलेले हे पहिलेच आंदोलन असून, युनायटेड फोरम ऑफ रिझर्व्ह बँक ऑफिसर्स ऍण्ड एम्लॉईज या चार संघटनांच्या शिखर संस्थेने केलेल्या आवाहनानुसार हे आंदोलन करण्यात आले. आरबीआयकडून सार्वजनिक कर्ज व्यवस्थापन काढून घेण्यासह पतधोरण ठरविण्याच्या मध्यवर्ती बँकेच्या अधिकारात कपात करण्याच्या केंद्राच्या योजनेचा निषेध म्हणून हा संप पुकारण्यात आला.
सरकार वेगवेगळ्या माध्यमातून आरबीआयची कार्ये काढून घेत आहेत. आता सरकारने सार्वजनिक कर्ज व्यवस्थापन संस्था (पीडीएमए) स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पतधोरण हा आरबीआयच्या अधिकार क्षेत्रातील विषय आहे आणि आरबीआयच्या अधिकारात कपात करून सरकारही याचा हिस्सा होऊ बघत आहे, असे युनायटेड फोरमचे संयोजक समीर घोष यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25561

Posted by on Nov 19 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1210 of 2453 articles)


=पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले अंत्यदर्शन= नवी दिल्ली, [१८ नोव्हेंबर] - विश्‍व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ नेते आणि रामजन्मभूमी आंदोलनातील अग्रणी अशोक ...

×