Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » आरबीआय, अर्थमंत्रालय यांच्यात सौहार्दाचे संबंध: अर्थमंत्री

आरबीआय, अर्थमंत्रालय यांच्यात सौहार्दाचे संबंध: अर्थमंत्री

Arun Jaitley10नवी दिल्ली, [१६ मे] – बेरोजगारी आणि औद्योगिक विकासातील अडथळ्यांच्या पार्श्‍वभूमीवर आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या दुसर्‍या कारकीर्दीवर अनिश्‍चिततेची टांगती तलवार असतानाच, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज सोमवारी भारतीय रिझर्व्ह बँक आणि अर्थमंत्रालय यांच्यात अतिशय सौहार्दाचे संबंध असल्याचे स्पष्ट केले.
आरबीआय आणि अर्थमंत्रालय या दोहोंची भूमिका देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाची आहे आणि या दोन्ही संस्थांमध्ये अतिशय चांगले आणि परिपक्व संबंध आहेत. आर्थिक मुद्यांवर आम्ही एकमेकांशी सल्लामसलत करतो आणि परस्परांचे मतही विचारात घेत असतो, असे जेटली यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.
राजन यांना दुसरी कारकीर्द मिळणार का, असे विचारले असता, प्रसारमाध्यमांपुढे चर्चा करण्यासारखा हा मुद्दा नाही, असे जेटली म्हणाले. आरबीआयचे गव्हर्नर म्हणून राजन यांची तीन वर्षांची कारकीर्द येत्या सप्टेंबर महिन्यात पूर्ण होत आहे. विशेष म्हणजे, राजन यांनी अलीकडेच दुसर्‍या कारकीर्दीसाठी इच्छुक असल्याचे संकेत देतानाच, मी आपले कार्य प्रामाणिक केले असून, देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणखीही बरेच काही करायचे आहे, असे सांगितले होते. तर, देशातील वाढती बेरोजगारी आणि औद्योगिक विकासाच्या खुंटलेल्या गतीसाठी राजन यांची धोरणेच कारणीभूत असल्याने त्यांना गव्हर्नर पदावरून दूर करण्यात यावे, अशी मागणी भाजपा नेते सुब्रमण्यम् स्वामी यांनी गेल्या आठवड्यात केली होती.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28274

Posted by on May 16 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (339 of 2450 articles)


चेन्नई, [१६ मे] - पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा शेवटच्या टप्पाला आज सुरूवात झाली आहे. तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरी या ...

×