Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » आरोग्य विज्ञान विद्यापीठास गोपीनाथ मुंडे यांचे नाव द्या

आरोग्य विज्ञान विद्यापीठास गोपीनाथ मुंडे यांचे नाव द्या

=मुंडे यांच्या १२ डिसेंबरच्या जयंतीचे औचित्य साधून व्हावा निर्णय=
Gopinath Mundeमुंबई, [२४ नोव्हेंबर] – नाशिक येथे असलेल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि मराठवाड्याचे सुपुत्र लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याची मागणी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी केली.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे राष्ट्रीय व राज्यस्तरावरील सामाजिक काम विचारात घेऊन त्यांचे कायमस्वरूपी स्मारक व्हावे, यासाठी १२ डिसेंबर २०१५ रोजी त्यांच्या जयंतीच्या दिवसाचे औचित्य साधून शासनाने नाशिकस्थित महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठास लोकनेते कै. गोपीनाथ मुंडे आरोग्य विज्ञान विद्यापीठ असे नामकरण करण्याबाबतची घोषणा करावी, अशी मागणी आमदार मोते यांनी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
शासनाकडे आलेल्या मागणी प्रस्तावानुसार सदरचा प्रस्ताव ३१ ऑगस्ट २०१५ च्या पत्रान्वये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठास कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला होता. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २८ ऑक्टोबर २०१५ च्या अधिसभेच्या बैठकीत कुलसचिवांच्या उपस्थितीत हा विषय चर्चेला आला होता. अधिसभेने सदर विषय हा शासनाच्या अखत्यारीत असल्यामुळे शासन जो निर्णय घेईल त्यास सभागृहाची मान्यता असेल, असे सांगून ठराव सर्व संमतीने मंजूर केला असून शासनाने निर्णय घ्यावा, असे सूचित केल्याचे मोते यांनी या पत्रात नमूध केले आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिसभेची कोणतीही हरकत नसल्याने शासनाने तातडीने हा निर्णय घ्यायला हवा. शासनाच्या आणि आरोग्य विद्यापीठाच्या विचाराधीन हा प्रस्ताव आहेच, मुंडे यांच्या नावाला त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे कोणी विरोध करण्याचा प्रश्‍नच नाही. पुढच्या महिन्यात मुंडे यांची जयंती आहे, त्या पार्श्‍वभूमीवर आपण मुख्यमंत्री आणि शिक्षणंमत्री यांना भेटून मागणी केल्याचे आमदार रामनाथ मोते यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25715

Posted by on Nov 24 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1156 of 2451 articles)


=५० टक्के नागरिकांचे मत= लंडन, [२४ नोव्हेंबर] - पॅरिस येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर ५० टक्क्यांपेक्षा जास्त ब्रिटिश नागरिकांना युरोपियन ...

×