Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » आरोप सिद्ध करा, अन्यथा राजीनामा द्या

आरोप सिद्ध करा, अन्यथा राजीनामा द्या

=खा. महेश गिरी यांचे बेमुदत उपोषण=
mahesh giriनवी दिल्ली, [२० जून] – नवी दिल्ली महानगरपालिकेचे कायदेविषयक सल्लागार एम. एम. खान यांच्या हत्येच्या प्रकरणात सहभाग असल्याचा खोडसाळ आरोप केल्याबद्दल भाजपा खासदार महेश गिरी यांनी रविवारपासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
खान यांच्या हत्येत महेश गिरी आणि नवी दिल्ली महानगर पालिकेचे उपाध्यक्ष करणसिंह तंवर यांचा सहभाग असल्याचा आरोप मुख्यमंत्री केजरीवाल यांनी वारंवार केला होता.
महानगर पालिकेचे विधी अधिकारी असलेल्या खान यांची १६ मे रोजी जमियानगर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. द कनॉट या तारांकित हॉटेलच्या जागेची लीज रद्द करण्याबाबतचा आदेश खान दुसर्‍या दिवशी देणार होते. या प्रकरणात हॉटेलचा मालक रमेश कक्कडसह ६ जणांना अटक करण्यात आली आहे.
आपल्यावरील आरोप जाहीर चर्चेच्या माध्यमातून सिद्ध करा, अन्यथा माफी मागा, असे आव्हान महेश गिरी यांनी केजरीवाल यांना दिले होते. आरोप सिद्ध झाल्यास राजकारण संन्यास घेण्याची घोषणाही गिरी यांनी केली होती. केजरीवाल आरोप सिद्ध करू शकले नाही तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी गिरी यांनी केली आहे. आपल्या मंत्र्यांवर जेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप होतात, तेव्हा जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी केजरीवाल असे खोडसाळ आरोप करतात, असे गिरी यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, या जाहीर चर्चेसाठी महेश गिरी यांनी रविवारी कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये तयारीही केली होती. या ठिकाणी चर्चेसाठी येण्याचे निमंत्रण केजरीवाल यांना देण्यात आले होते. महेश गिरी आणि मोठ्या संख्येत भाजपा कार्यकर्ते गोळा झाले होते. पण केजरीवाल या ठिकाणी आलेच नाही. त्यामुळे महेश गिरी यांनी त्यांच्या निवासस्थानासमोर उपोषण सुरू केले आहे. या आरोपातून दिल्ली पोलिसांनी महेश गिरी आणि करणसिंह तंवर यांना क्लीनचिट दिली आहे.
दरम्यान, आम आदमी पार्टीने गिरी आणि तंवर यांच्यावरील आरोपांचा पुनरुच्चार केला आहे. दिल्ली पोलिस भाजपाच्या प्रवक्त्याप्रमाणे वागत असल्याचा आरोपही आपने केला आहे. तर आपचे नेते आशुतोष यांनी महेश गिरी यांनी किमान २० दिवस उपोषण करावे, असे आव्हान दिले आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी १५ दिवस उपोषण केले होते, त्यामुळे महेश गिरी यांनी २० दिवस उपोषण करायला हरकत नाही, असे आशुतोष म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28669

Posted by on Jun 21 2016. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (209 of 2452 articles)


=ऑगस्टा हेलिकॉप्टर्स खरेदी घोटाळा, ८० कोटींचे समभाग जप्त= नवी दिल्ली, [२० जून] - ऑगस्टा वेस्टलॅण्ड कंपनीकडून व्हीव्हीआयपींसाठी खरेदी करण्यात येणार्‍या ...

×