Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » आर्थिक विकास लवकरच दुहेरी आकड्यात

आर्थिक विकास लवकरच दुहेरी आकड्यात

=राजनाथसिंह यांचा विश्‍वास=
rajnath-singhनवी दिल्ली, [२८ नोव्हेंबर] – संपुआ सरकारच्या काळात मृतप्राय झालेल्या अर्थव्यवस्थेला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारने नवसंजीवनी दिली. आर्थिक विकासाच्या प्रचंड गतीमुळे भारत हा विदेशी गुंतवणूकारांसाठी मुख्य केंद्रबिंदू झाला आहे. नजीकच्या भविष्यातच आर्थिक विकासाचा दर दुहेरी आकड्यात राहील, असा विश्‍वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज शनिवारी व्यक्त केला.
१९९८ मध्ये केंद्रात अटलबिहारी वाजपेयी सरकार केंद्रात सत्तेत आल्यानंतर आर्थिक आघाडीवर अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. यामुळे आर्थिक विकासाचा दर आठ टक्क्यांवर पोहोचला होता. त्या काळात जगात आर्थिक मंदीचे सावट असतानाही, भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा कुठलाही परिणाम झाला नव्हता. त्यानंतर २००४ मध्ये कॉंग्रेसच्या नेतृत्वात केंद्रात संपुआ सरकार आले आणि चुकीच्या धोरणांमुळे आर्थिक विकासाला खिळ बसली.
देशाला ऐच्छिक विकास दर साधणे शक्य झाले नाही. २०१४ मध्ये देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा भाजपा सरकार आले आणि आर्थिक विकासाला प्रचंड वेग प्राप्त झाला. ही गती अशीच कायम राहिली, तर आगामी दोन वर्षांतच विकासाचा दर दुहरी आकड्यात राहील, असे राजनाथसिंह यांनी पीएचडी चेम्बर ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले.
देशाच्या आर्थिक विकासाचा दर ७.५ टक्के इतका आहे. जगभरातील गुंतवणूकदार भारताकडे आकर्षित झाले आहेत, असे सांगताना, आमच्या सरकारच्या काळात महागाई पूर्णपणे नियंत्रणात आली, असा दावा मी कदापि करणार नाही. पण, बहुतांश जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मात्र आटोक्यात आल्या आहेत, असे मी विश्‍वासाने सांगू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. आमचे विरोधक म्हणतात की, डाळी आणि भाजीपाल्यांच्या किमती आवाक्याबाहेर गेल्या आहेत. मुद्दे नसल्याने ते अशी ओरड करीत आहेत. सत्यता अशी आहे की, डाळींचा काळाबाजार रोखून सरकारने मोठ्या प्रमाणात डाळ जप्त केली. यामुळे आता पुन्हा एकदा किमती आटोक्यात आलेल्या आहेत, असेही राजनाथसिंह म्हणाले.

Short URL: http://vrittabharati.in/?p=25815

Posted by on Nov 29 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1122 of 2450 articles)


=प्रशांत भूषण यांची टीका, केंद्रासोबत संघर्ष हाच त्यांचा छंद= नवी दिल्ली, [२८ नोव्हेंबर] - देशव्यापी आंदोलनाच्या काळात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा ...

×