Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » आर के माथूर नवे सीआयसी

आर के माथूर नवे सीआयसी

rk-mathur cicनवी दिल्ली, [१८ डिसेंबर] – विद्यमान माहिती आयुक्तांपैकीच नियुक्ती करण्याच्या परंपरेला फाटा देत केंद्र सरकारने आज शुक्रवारी माजी संरक्षण सचिव आर. के. माथूर यांची मुख्य माहिती आयुक्त (सीआयसी) म्हणून नियुक्ती केली. सीआयसी विजय शर्मा यांचा कार्यकाळ १ डिसेंबर रोजी संपुष्टात आल्यापासून हे पद रिक्त होते. आर. के. माथूर यांची नवे सीआयसी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. ६२ वर्षीय माथूर यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा किंवा वयाची ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत असेल. त्रिपुरा तुकडीचे निवृत्त आयएएस अधिकारी असलेले माथूर यांची २८ मे २०१३ रोजी दोन वर्षांच्या निश्‍चित कालावधीसाठी संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26200

Posted by on Dec 19 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1013 of 2453 articles)


=बाजीराव मस्तानीलाही जोरदार विरोध, कोल्हापूर, पुण्यात शो बंद पाडले= नवी दिल्ली, [१८ डिसेंबर] - पुण्यात बाजीराव मस्तानी चित्रपटाला भाजपाने विरोध ...

×