Home » आसाम, ठळक बातम्या, बंगाल, राज्य » आसाम, प बंगालमध्ये पहिल्या टप्प्याचा प्रचार थंडावला

आसाम, प बंगालमध्ये पहिल्या टप्प्याचा प्रचार थंडावला

West_Bengal_Election_2016नवी दिल्ली, [२ एप्रिल] – आसाम आणि पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचा प्रचार आज शनिवारी थंडावला आहे. या दोन्ही राज्यांमध्ये ४ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
आसामात निवडणुकीचे दोन टप्पे होणार असून, पश्‍चिम बंगालमध्ये मात्र सहा टप्प्यांत मतदान होणार आहे. या दोन्ही राज्यांमध्ये पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीकरिता भाजपा आणि कॉंगे्रससह सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी जोरदार प्रचार केला आहे. काही वृत्तवाहिन्यांनी केलेल्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणात पश्‍चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांचा तृणमूल कॉंगे्रस पक्ष आणि आसामात भाजपा काठावरच्या बहुमताने सत्तेवर येणार असल्याचे भाकीत केले आहे. या काळात इतरही तीन राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असून या सर्व पाचही राज्यांमध्ये २१ मे रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27668

Posted by on Apr 3 2016. Filed under आसाम, ठळक बातम्या, बंगाल, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आसाम, ठळक बातम्या, बंगाल, राज्य (539 of 2452 articles)


=ताशी १६० किमीचा वेग= आग्रा, [२ एप्रिल] - देशातील सर्वाधिक गतीने धावणारी दिल्ली ते आग्रा ही पहिली गतिमान एक्सप्रेस येत्या ...

×