Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » इसिसविरुद्ध सर्वधर्मीय लढा देतील

इसिसविरुद्ध सर्वधर्मीय लढा देतील

=राजनाथसिंह यांचा विश्‍वास=
Rajnath-Singh_1नवी दिल्ली, [२१ मे] – इसिसची धमकी आम्ही दुर्लक्षित करणार नाही. पण, राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्यासाठी आपल्या सरकारने आवश्यक ती सर्वच पावले उचलली आहेत. देशातील सर्वधर्मीय लोक इसिस आणि अन्य दहशतवादी संघटनांचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज शनिवारी येथे केले.
देशाच्या सुरक्षेसाठी जे काही शक्य आहे ते आम्ही करीत आहोत. या देशात राहणारा प्रत्येक जाती, धर्म आणि पंथातील नागरिकही विश्‍वासाने अशा धोक्यांचा सामना करणार आहे, असे राजनाथसिंह यांनी आंतरराष्ट्रीय बुद्ध पौर्णिमा दिवस कार्यक्रमाच्या अनुषंगाने पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी उपस्थित असलेले गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू म्हणाले की, व्हिडीओच्या माध्यमातून अशा प्रकारचा अपप्रचार पसरविण्याचे इसिसचे डावपेच देशातील तरुणांचे मन प्रभावित करू शकणार नाही. अशा अपप्रचाराला बळी न पडण्याचा निर्णय देशवासीयांनी घेतला आहे.
यानंतर बुद्ध पौर्णिमा कार्यक्रमात बोलताना राजनाथसिंह म्हणाले की, अलीकडील काळात काही फुटीरतावादी मानसिकता असलेले लोक देशातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा समस्यांवर तथागत गौतम बुद्धाचा शांतता आणि अहिंसा या संदेशातच तोडगा आहे. आम्ही कोणत्याही हिंसाचारावर विश्‍वास ठेवणार नाही, असा संकल्प देशवासीयांनी घ्यायला हवा. प्रत्येकांनी प्रत्येक धर्माचा सन्मान करावा.
हिंदू संस्कृतीत गौतम बुद्धाला भगवान विष्णूचा नववा अवतार मानले जाते. त्यामुळे बुद्ध जयंती केवळ बौद्ध धर्मासाठीच नाही, तर हिंदू धर्मासाठीही तितकीच महत्त्वाची मानली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देखील गौतम बुद्धाचेच अनुयायी होते आणि म्हणूनच सर्वधर्मीयांनी त्यांच्या विचारांचा स्वीकार केला आहे, याकडेही राजनाथसिंह यांनी लक्ष वेधले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28377

Posted by on May 22 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (304 of 2453 articles)


=लाखो भाविकांचा सहभाग, कडेकोट सुरक्षा व्यवस्था= उज्जैन, [२१ मे] - येथे गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या सिंहस्थ महाकुंभांचा आज शनिवारी ...

×