Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » इसिस, अल् कायदाचा वित्तपुरवठा थांबणार

इसिस, अल् कायदाचा वित्तपुरवठा थांबणार

=युनोच्या सुरक्षा परिषदेत एकमताने ठराव पारित=
UNO united-nations-buildingसंयुक्त राष्ट्रसंघ, [१८ डिसेंबर] – इराक व सीरिया आणि अफगाणिस्तानसह जगाच्या अनेक भागांमध्ये हिंसक कारवाया करून दहशत निर्माण करणार्‍या इसिस आणि अल् कायदा या दहशतवादी संघटनांच्या अर्थपुरवठ्याचे सर्व स्रोत बंद करण्याची तरतूद असलेला प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेने एकमताने पारित केला असून, या दोन्ही संघटनांवर निर्बंध घालण्याचा मानस अनेक सदस्य राष्ट्रांनी व्यक्त केला आहे.
१५ सदस्यांचा समावेश असलेल्या सुरक्षा परिषदेने गुरुवारी एकमताने हा प्रस्ताव पारित केला. इसिस आणि अल् कायदा या संघटनांवर घालण्यात आलेली निर्बंधांच्या यादीचा फेरआढावा घेण्यासह या संघटनांना होणारा अर्थपुरवठा रोखण्याच्या हेतूने यंत्रणेत असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याचाही निर्धार व्यक्त करण्यात आला. या महिन्यात सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद अमेरिकेकडे असून, अमेरिकेचे अर्थमंत्री जॅक लीव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव पारित करण्यात आला.
या क्षेत्रात माहितीचे आदानप्रदान करण्यासह संशयित व्यवहारांची ओळख पटविण्याच्या दृष्टीने खाजगी क्षेत्राची मदत घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य करण्याचे आवाहनही या प्रस्तावात करण्यात आले आहे. इसिस हे मोठे आव्हानात्मक आर्थिक लक्ष्य आहे, असे लीव यांनी यावेळी बोलताना सांगितले. इतर दहशतवादी संघटनांच्या तुलनेत इसिस विदेशी देणगीदारांकडून फारच थोडी मदत घेते. याउलट इसिस आर्थिक कारवाया आणि आपल्या ताब्यात असलेल्या भूभागातील स्रोतांमधून मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा करत आहे. इसिसने इंधनाचा काळा बाजार करून आतापर्यंत ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आणि त्यापेक्षाही जास्त रक्कम खंडणी आणि अत्याचार करून गोळा केली आहे, असेही लीव म्हणाले.
इसिस आणि अल् कायदाविरोधात पारित करण्यात आलेला हा ठराव एक मोठे पाऊल असले तरी यानंतर सदस्य देश याची अंमलबजावणी कशाप्रकारे करतात यावरही बरेच काही अवलंबून असल्याचेही लीव यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26193

Posted by on Dec 19 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1021 of 2458 articles)


=केजरीवालांचा नवा आरोप= नवी दिल्ली, [१८ डिसेंबर] - केंद्र सरकार आणि दिल्लीत सत्तारूढ असलेला आम आदमी पक्ष यांच्यातील वाक्‌युद्ध आज ...

×