Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » इसिस समुहाकडून तेल खरेदी करण्यास सीरियाला प्रतिबंध

इसिस समुहाकडून तेल खरेदी करण्यास सीरियाला प्रतिबंध

syria-MAPवॉशिंग्टन, [२६ नोव्हेंबर] – इसिस समुहाकडून तेल खरेदी करण्यास अमेरिकेने सीरियावर प्रतिबंध घातला आहे. सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर-अल-असद यांचे सरकार आणि मध्यस्थांवरही अमेरिकेने यासाठी प्रतिबंध लावला आहे. सरकारसाठी त्यांनी इसिसकडून तेल खरेदी केले होते.
आपल्याच लोकांविरुद्ध क्रूरता आणि हिंसाचार पसरविण्यासाठी सीरियन सरकार जबाबदार आहे. असा हिंसाचार सुरू ठेवण्यास जे असद शासनाला मदत करीत आहेत, त्यांच्या आर्थिक स्त्रोतांना अमेरिका लक्ष्य करणे सुरूच ठेवेल, असे दहशतवाद आणि आर्थिक गुप्तचर विभागाचे उपमंत्री एडम जुबिन यांनी प्रतिबंधाची घोषणा करताना जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. असद सरकारचे समर्थन करणार्‍या चार लोकांविरुद्ध आणि सहा संघटनांविरुद्ध हा प्रतिबंध लावण्यात आला आहे. सीरियन सरकारसाठी तेल खरेदी करण्यासाठी मध्यस्थी करणार्‍या इस्लामिक स्टेट ऑफ इराक ऍन्ड द लेवांतचाही (आयएसआयएल) यात समावेश आहे. आयएसआयएल हे दहशतवादी संघटना इसिसचे दुसरे नाव आहे. सीरियन नागरिक जॉर्ज हसवानी आणि त्यांची कंपनी एचईएससीओ इंजिनीयरिंग ऍन्ड कन्स्ट्रक्शन कंपनीवरही यासाठी प्रतिबंध लावण्यात आला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25752

Posted by on Nov 27 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1151 of 2458 articles)


=स्वच्छ भारत, मेक इन इंडियाच्या प्रश्नावर विद्यार्थिनींची चपराक= बंगळुरू, [२५ नोव्हेंबर] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत आणि मेक ...

×