Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » ईडीच्या विविध शहरांमध्ये धाडी

ईडीच्या विविध शहरांमध्ये धाडी

=ऑगस्टा हेलिकॉप्टर्स खरेदी घोटाळा, ८० कोटींचे समभाग जप्त=
ed dierctorate of enforcementनवी दिल्ली, [२० जून] – ऑगस्टा वेस्टलॅण्ड कंपनीकडून व्हीव्हीआयपींसाठी खरेदी करण्यात येणार्‍या हेलिकॉप्टर्सच्या सौद्यात झालेल्या घोटाळाप्रकरणी नव्याने कारवाई करताना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज सोमवारी राजधानी, दिल्ली आणि हैदराबाद या तीन शहरांमध्ये धाडी घातल्या आणि ८६ कोटी रुपये किमतीचे विदेशी समभाग जप्त केले.
हेलिकॉप्टर्स घोटाळ्यात सहभागी असलेल्या सुमारे १० कंपन्याच्या संकुलांची ईडीच्या विविध पथकांनी कसून झाडाझडती घेतली. या धाडीत कंपन्यांच्या विविध संकुलांमधून मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह दस्तावेजही ताब्यात घेण्यात आले. या घोटाळ्यात कंपन्यांचा सहभाग असल्याचे ईडीच्या तपासात स्पष्ट झाले होते.
बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली. काही कंपन्यांनी दुबई, मॉरीशस आणि सिंगापूरमधील ८६.०७ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले होते. त्यांची कागदपत्रे ईडीच्या अधिकार्‍यांना मिळाल्यानंतर लगेच हे समभाग जप्त करण्यात आले, अशी माहिती या धाडसत्राशी संबंधित एका अधिकार्‍याने वृत्तसंसथेला दिली.
ईडीने अलीकडेच या सौद्यात मध्यस्थ असलेला ब्रिटिश नागरिक ख्रिस्तियन मायकेल जेम्सविरोधात विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीने २०१४ मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करून माजी हवाईदल प्रमुख एस. पी. त्यागी आणि अन्य २१ जणांना आरोपी बनविले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28666

Posted by on Jun 21 2016. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (211 of 2453 articles)


=चेतन भगत यांचा ‘आप’वर पलटवार= नवी दिल्ली, [२० जून] - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदाची जबाबदारी मी उत्कृष्टपणे पार पाडेन. ...

×