Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » उत्तर कोरियाकडून दोन क्षेपणास्त्रांची चाचणी

उत्तर कोरियाकडून दोन क्षेपणास्त्रांची चाचणी

North_Korea_flagसेऊल, [२२ जून] – सोमवारी २५०० किमीची मारक क्षमता असलेल्या घातक क्षेपणास्त्राची चाचणी केल्यानंतर उत्तर कोरियाने आज बुधवारी आणखी दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली.
मुसूदन असे या क्षेपणास्त्राचे नाव असून, याच मालिकेतील एका क्षेपणास्त्राची सोमवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. उत्तर कोरियाकडून या वर्षीच्या जानेवारीपासून सातत्याने मुसूदनची चाचणी सुरू होती. पण, यातील सलग चार चाचण्या अपयशी ठरल्यानंतर पाचवी व सहावी चाचणी यशस्वी राहिली. या चाचणीवर अमेरिका आणि दक्षिण कोरियानेही शिक्कामोर्तब केले आहे.
आज चाचणी केलेल्या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता ३५०० किलोमीटर इतकी असल्याचे उत्तर कोरियातील वृत्तसंस्थांनी म्हटले आहे.
अमेरिकेकडून निषेध
उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीचा अमेरिका आणि दक्षिण कोरियाने तीव्र निषेध केला आहे. शेजारील देशांना चिथावण्याचा हा प्रकार असल्याचे मत अमेरिकेने व्यक्त केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28733

Posted by on Jun 23 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (196 of 2458 articles)


=शांघाय समूहाची आजपासून बैठक= बीजिंग, [२२ जून] - शांघाय को-ऑपरेशन ऑर्गानायझेशनची (एससीओ) बैठक उद्या गुरुवारपासून उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे सुरू ...

×