Home » कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय » उसउत्पादकांना सबसिडी

उसउत्पादकांना सबसिडी

=केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय=
piyushgoyal_0नवी दिल्ली, [१८ नोव्हेंबर] – आर्थिक संकटात सापडलेल्या साखर कारखान्यांना मदतीचा हात देण्यासाठी २०१५-१६ या वर्षाकरिता उसउत्पादक शेतकर्‍यांना उत्पादनावर आधारित प्रति क्विंटल ४.५० रुपये थेट सबसिडी देण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज बुधवारी घेतला. यामुळे चालू आर्थिक वर्षात सरकारच्या तिजोरीवर ११४७ कोटी रुपयांचा भुर्दंड बसणार आहे.
आर्थिक व्यवहारावरील कॅबिनेट कमिटीच्या बुधवारी दुपारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. किरकोळ बाजारात साखरेची किंमत अतिशय कमी असल्याने साखर कारखानदारांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या कारखानदारांना सध्या उसउत्पादक शेतकर्‍यांची ६५०० कोटी रुपयांची थकबाकी देणे आहे. ही थकबाकी आणखी कमी करून शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी सरकारने जागतिक व्यापार संघटनेच्या अनुरूप धोरण स्वीकारले आहे. उसाच्या उत्पादनावर आधारित ही सबसिडी उसाच्या किमतीनुसार देण्यात येणार आहे. तसेच शेतकर्‍यांना त्यांच्या उसाची वेळीच वेळीच रोखीने किंमत देणार्‍या कारखानदारांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती ऊर्जा व कोळसा मंत्री पीयूष गोयल यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
कोल इंडियातील समभाग विकणार
अन्य एका महत्त्वाच्या घडामोडीत सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या कोल इंडियामधील आपले १० टक्के समभाग विकून २० हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती देताना गोयल म्हणाले की, सध्या शेअर बाजारातील दरानुसार कोल इंडिया लिमिटेडमधील सरकारच्या १० टक्के समभागांची किंमत २१,१३७.७१ कोटी रुपये इतकी आहे.
निर्यातीवर तीन टक्के सबसिडी
सातत्याने सुरू असलेली घसरण रोखून निर्यातीत प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने निर्यातदारांकरिता तीन टक्के व्याज सबसिडी योजना मंजूर केली. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर वार्षिक २७०० कोटी रुपयांचा भुर्दंड बसणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25551

Posted by on Nov 18 2015. Filed under कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1214 of 2453 articles)


=सोनियांनी माफी मागावी: व्यंकय्या नायडू यांची मागणी= नवी दिल्ली, [१८ नोव्हेंबर] - पाकिस्तानला खुश करण्यासाठी त्या देशाच्या भूमीत जाऊन भारत ...

×