Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » एनआयएच्या कारभारात हस्तक्षेप नाही

एनआयएच्या कारभारात हस्तक्षेप नाही

=राजनाथसिंह यांची स्पष्टोक्ती=
rajnath singh3नवी दिल्ली, [२० मे] – राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) केलेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासात राजकीय हस्तक्षेपाचा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी स्पष्टपणे फेटाळून लावला असून, देशातील तपास यंत्रणा स्वायत्तपणे काम करत असल्याचे स्पष्ट केले आहे.
देशातील सर्व तपास यंत्रणांना पूर्ण स्वायत्तता आहे आणि त्यांच्या तपासात राजकीय किंवा सरकारी असा कोणताही हस्तक्षेप केला जात नाही, असे सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) कार्यक्रमाच्या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना राजनाथसिंह यांनी सांगितले.
पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी एनआयएचे पथक पाकिस्तानमध्ये केव्हा जाण्याची शक्यता आहे, असे विचारले असता, दोन्ही देशांचे परराष्ट्र सचिव या मुद्यावर चर्चा करत असल्याचे राजनाथसिंह म्हणाले.
२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास करणार्‍या एनआयएने गेल्याच आठवड्यात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर व इतर पाच आरोपींना क्लीन चिट दिली. शिवाय मुंबई न्यायालयात सादर केलेल्या पुरवणी आरोपपत्रात लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहितसह सर्व १० आरोपींवर मोक्का या कठोर कायद्यांतर्गत लावण्यात आलेले आरोप मागे घेतले.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28359

Posted by on May 21 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (307 of 2450 articles)


=पक्षकार्यकर्त्याचे अपहरण व मारहाण प्रकरण= चिपळूण, [२० मे] - पक्षाच्या एका कार्यकर्त्याचे अपहरण करून त्याला जबर मारहाण केल्याचा आरोप असलेले ...

×