Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » एनएसजीमध्ये भारताचा प्रवेश निश्‍चित

एनएसजीमध्ये भारताचा प्रवेश निश्‍चित

=अमेरिकेने दिले स्पष्ट संकेत, चीन, पाकला जबरदस्त धक्का=
US spokesman, John Kirbyवॉशिंग्टन, [१४ मे] – अण्वस्त्र पुरवठादार गटांच्या राष्ट्र समूहात (एनएसजी) भारताला प्रवेश मिळायला नको, यासाठी चीन व पाकिस्तानकडून सातत्याने सुरू असलेल्या प्रयत्नांना जबरदस्त धक्का बसला आहे. या गटात सहभागी होण्यासाठी असलेले सर्व निकष भारताने पूर्ण केले असून, आमच्या विशेष क्लबमध्ये सहभागी होण्याचा भारताचा मार्ग मोकळा झाला आहे, असे अमेरिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी गेल्या वर्षीच्या भारत दौर्‍याच्या काळात जे विधान केले होते, त्याची मी आज तुम्हाला आठवण करून देत आहो. क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण प्रणालीसाठी आवश्यक असलेल्या निकषांची भारताने पूर्तता केली असल्याने एनएसजीचे सदस्यत्व स्वीकारण्याचा या देशाचा मार्गही सुकर झाला आहे, असे अमेरिकन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
एनएसजीच्या सदस्यत्वापासून भारताला दूर ठेवण्यासाठी पाकिस्तान आणि चीन एकत्र आले असल्याच्या वृत्ताच्या पार्श्‍वभूमीवर त्यांना याबाबतचा प्रश्‍न विचारण्यात आला होता. भारताबाबत चीन व पाक सरकारची जी भूमिका आहे, त्याविषयी मला फार जास्त बोलायचे नाही. कारण, एनएसजीमध्ये कोणत्याही देशाचा समावेश करण्याचा निर्णय या गटातील सदस्य राष्ट्रांचा अंतर्गत स्वरूपाचा असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चीनची मुजोरी कायम
दरम्यान, भारताचा मार्ग रोखण्याच्या आपल्या भूमिकेचे समर्थन करताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयातील प्रवक्ते लू कँग म्हणाले की, अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी करणारा देश एनएसजीमध्ये प्रवेश करण्यासाठी पात्र ठरत असतो. हे केवळ आमचेच नाही, तर अन्य ४८ देशांचेही मत आहे. त्यामुळेच भारताला एनएसजीचे सदस्यत्व देण्यास आमचा विरोध आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28233

Posted by on May 15 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (358 of 2458 articles)


नवी दिल्ली, [१४ मे] - सर्वसामान्य घरच्या वृद्धांवरच वृद्धाश्रमात राहायची वेळ येते, असे नाही, तर मोठे नाव असलेल्या घरच्या लोकांवरही ...

×