richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » एनएसजीसाठी भारताला न्यूझिलंडचे समर्थन मिळणार

एनएसजीसाठी भारताला न्यूझिलंडचे समर्थन मिळणार

nsg-nuclear suppliers groupनवी दिल्ली, [१६ जून] – एनएसजीत प्रवेश मिळण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या भारताला न्यूझिलंडचे समर्थन मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या राजकीय दबावानंतर न्यूझिलंडने आपल्या धोरणात ही नरमाई दाखवली आहे.
तथापि मिळालेल्या माहितीनुसार या समूहाच्या विस्तारासाठी एक मानदंडाधारित प्रक्रिया असावी, असे मत न्यूझिलंडने व्यक्त केले आहे.
व्हिएन्नात मागच्या महिन्यात झालेल्या बैठकीत भारताच्या सदस्यत्वाबाबत कोणताच निर्णय झाला नाही. भारताने एनपीटीवर स्वाक्षरी केली नसल्याने तुर्कस्तानसह न्यूझिलंड, ऑस्ट्रिया, आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे भारतविरोधी भूमिका घेऊन असल्याचे आधी बोलले गेले. पण अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी सर्व एनएसजीच्या सदस्य देशांना पत्र लिहून भारताला विरोध न करण्याबाबत सुचवल्यावर न्यूझिलंड व ऑस्ट्रिया यांनी आपल्या नकारात्मक धोरणात थोडी नरमाई आणल्याचे दिसून आले.
दुसरीकडे तुर्कस्तान पाकिस्तानचे समर्थन करीत असल्याचे समजते. एवढेच नाही तर भारत आणि पाकिस्तान यांच्या अर्जावर समान विचार केला जावा, अशी मागणीही तुर्कस्तानने केली आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांचे परराष्ट्र सल्लागार सरताज अजीज यांनी, या मुद्यावर पाकिस्तानचे समर्थन केल्याबद्दल तुर्कस्तानला धन्यवाद दिले आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28625

Posted by on 3:26 pm. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google