Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » एलपीजी सब्‌सिडीतून २१ हजार कोटींची बचत

एलपीजी सब्‌सिडीतून २१ हजार कोटींची बचत

=धर्मेंद्र प्रधान यांची माहिती=
dharmendra pradhanनवी दिल्ली, [४ मे] – स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडवरील सब्‌सिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे मध्यस्थांचे उच्चाटन होऊन एकाचे सिलेंडर दुसर्‍याला विकणे किंवा सब्‌सिडीची रक्कम गहाळ करणे यासारख्या प्रकारांवर आळा बसला असून, याचा फायदा गेल्या दोन वर्षांत २१ हजार कोटी रुपयांच्या बचतीत झाला, अशी माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज बुधवारी दिली.
सरकारने नोव्हेंबर २०१४ पासून काही निवडक जिल्ह्यांमध्ये थेट बँक खात्यात सब्‌सिडी जमा करण्याचे धोरण स्वीकारले होते. त्यानंतर १ जानेवारी २०१५ पासून देशभरातच ही योजना अंमलात आणली होती. १ एप्रिल २०१५ पर्यंत १८.१९ कोटी एलपीजीधारकांची नोंद होती. तर, १४.८५ कोटी सक्रिय ग्राहक होते. यातील ३.३४ कोटी ग्राहक बोगस असल्याचे दिसून आले. या ग्राहकांना सब्‌सिडीतून वगळण्यात आल्याने सरकारने त्या वर्षात १४,६७२ कोटी रुपयांची बचत केली होती. त्यानंतरच्या वर्षात आणखी सात हजार कोटी रुपयांची बचत करण्यात आली, असे प्रधान यांनी सांगितले.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28169

Posted by on May 5 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (376 of 2450 articles)


=सिगारेट कंपन्यांच्या याचिका कर्नाटकात स्थानांतरित= नवी दिल्ली, [४ मे] - सिगारेट, बिडी आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादनांच्या पाकिटावरील ८५ टक्के भागावर ...

×