Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » ए बी बर्धन रुग्णालयात, प्रकृती चिंताजनक

ए बी बर्धन रुग्णालयात, प्रकृती चिंताजनक

a b bardhanनवी दिल्ली, [७ डिसेंबर] – प्रख्यात कम्युनिस्ट नेते ए. बी. बर्धन यांना आज सोमवारी सकाळी अर्धांगवायूचा झटका बसल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले. ९२ वर्षीय बर्धन यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
राजधानी दिल्लीतील भाकपच्या मुख्यालयातच बर्धन यांचे वास्तव्य असून, आज सकाळी आठ वाजता त्यांना अर्धांगवायूचा जोरदार झटका बसला. त्यानंतर ते लगेच बेशुद्ध झाले. त्यांना लगेच मध्य दिल्लीतील जी. बी. पंत रुग्णालयात नेण्यात आले, असे भाकप नेते अतुलकुमार अंजान यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
बर्धन यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असून, वरिष्ठ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करीत आहेत, असे ते म्हणाले.
बर्धन यांच्या पत्नी नागपूर विद्यापीठात प्राध्यापक होत्या आणि त्यांचे १९८६ मध्ये निधन झाले होते.
ए. बी. बर्धन हे कामगार चळवळीतील अग्रगण्य नेते असून, महाराष्ट्रात डाव्यांचा पाया मजबूत करण्यात त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. १९५७ मध्ये ते महाराष्ट्र विधानसभेवर अपक्ष उमेदवार म्हणून निवडून गेले होते. भाकपच्या सरचिटणीसपदी निवड झाल्यानंतर त्यांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंगे्रसचे अध्यक्षपदही भूषविले आहे. बर्धन यांना यापूर्वी जानेवारीमध्ये प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना रक्तदाबाचा त्रास होत होता.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26031

Posted by on Dec 8 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1069 of 2453 articles)


नवी दिल्ली, [७ डिसेंबर] - धनादेश अनादर प्रकरणाचा निपटारा तातडीने करण्यासाठी आणण्यात आलेल्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट (सुधारित) विधेयक आज राज्यसभेत पारित ...

×