Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ऑगस्टाचा बोफोर्स होऊ देणार नाही

ऑगस्टाचा बोफोर्स होऊ देणार नाही

=व्ही. के. सिंह यांची स्पष्टोक्ती=
VK-Singh_4नवी दिल्ली, [३ मे] – व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी कॉंग्रेस पक्ष चांगलाच अडणीत आला असतानाच ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणाचा बोफोर्स होऊ देणार नाही, असे केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही आणि जो कोणी दोषी असेल त्याला कठोर शिक्षा दिली जाईल, असे व्ही. के. सिंह यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितले.
माझ्या कार्यकाळात अशाप्रकारच्या घोटाळा समोर आला असता तर मी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा देऊन चौकशीत सहभागी झालो असतो, असे सांगून तत्कालीन संरक्षण सचिव व विद्यमान महानियंत्रक व लेखापरीक्षक (कॅग) शशिकांत शर्मा यांनी तात्काळ राजीनामा देऊन चौकशीला सामोरे गेले पाहिजे, असे मतही सिंह यांनी व्यक्त केले.
या घोटाळ्यात सहभागी असलेल्या दोषींना कठोर शिक्षा करण्याचा सरकारचा मानस आहे. मग दोषी व्यक्ती कितीही मोठी असो. मात्र, असे करताना सरकार सूडाच्या भावनेने काम करणार नाही, असेही सिंह यांनी स्पष्ट केले. ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात ज्यांनी पैसे खाल्ले त्यांच्यावर खटला चालेल. शिवाय या प्रकरणात जी कोणती नावे समोर येतील त्या सर्वांची चौकशी केली जाईल, असेही व्ही. के. सिंह यांनी स्पष्ट केले. व्ही. के. सिंह यांनी यापूर्वीदेखील संसदेत कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल करताना कॉंग्रेसचा घोटाळ्यांचे सरकार, असा उल्लेख केला होता.
ब्राऊनही संशयाच्या भोवर्‍यात
ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असून, आता माजी वायुसेना प्रमुख नॉर्मन अनिल कुमार ब्राऊन हेदेखील संशयाच्या भोवर्‍यात अडकले असून, या खरेदी व्यवहारात त्यांच्या भूमिकेची चौकशी सुरू असल्याचे वृत्त आहे. तपास संस्था ब्राऊन यांच्यासोबतच त्यांच्या स्टाफच्या भूमिकेचीही चौकशी करीत आहेत. एनएके ब्राऊन ३१ जुलै २०११ ते ३१ डिसेंबर २०१३ या काळात वायुसेनाप्रमुख होते.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28155

Posted by on May 4 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (381 of 2450 articles)


=तृणमूल कॉंग्रेसचा सवाल, राज्यसभेतून बहिर्गमन= [caption id="attachment_28036" align="alignleft" width="300"] New Delhi: Opposition members protest in the Rajya Sabha in New ...

×