Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » कर्मचार्‍यांना मिळणार २० टक्के वेतनवाढ

कर्मचार्‍यांना मिळणार २० टक्के वेतनवाढ

=केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या बैठक, पंतप्रधानांनी मागितला अहवाल=
Salary_hikeनवी दिल्ली, [२७ जून] – सातव्या वेतन आयोगाचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थमंत्रालयाकडून मागितला आहे. येत्या बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, त्यात वेतन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांच्या वेतनात किमान २० टक्के वाढ अपेक्षित असल्याचे संकेत उच्चस्तरीय सूत्राने दिले आहेत.
सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे केंद्राच्या तिजोरीवर मोठा भार पडणार असला, तरी या कर्मचार्‍यांना त्यांचा हक्क देण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला आहे. याच अनुषंगाने त्यांनी हा अहवाल मागितला आहे. २९ जूनच्या बैठकीत या अहवालावर चर्चा होणार असून, त्यानंतर लगेच शिफारसींना मंजुरी मिळू शकते. याचा फायदा सध्या केंद्रीय सेवेत कार्यरत असलेले आणि निवृत्त झालेले अशा एकूण ९८.४ लाख लोकांना मिळणार आहे. यातील ५२ लाख निवृत्त कर्मचारी आहेत.
सातव्या वेतन आयोगाचा अहवाल अंमलात आणण्यासाठी केंद्र सरकारने याच वर्षीच्या जानेवारीत कॅबिनेट सचिव पी. के. सिन्हा यांच्या अध्यक्षतेत उच्चस्तरीय समिती गठित केली होती. सूत्राच्या मते, पुढील महिन्यातच या शिफारसी लागू होणार असून, थकबाकी या वर्षीच्या जानेवारीपासून मिळणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28967

Posted by on Jun 28 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (172 of 2453 articles)


=लाभाचे पद: निवडणूक आयोग करणार सुनावणी= नवी दिल्ली, [२७ जून] - कायद्यात तरतूद नसतानाही संसदीय सचिव या लाभाच्या पदावर नियुक्त ...

×