Home » कर्नाटक, ठळक बातम्या, राज्य » कामगारांना भेट म्हणून ‘नॅनो कार’

कामगारांना भेट म्हणून ‘नॅनो कार’

tata nano_colors_yellow1मंगळुरु, [५ मार्च] – मंगळुरुतील यंत्रसामग्रीचे व्यावसायिक वरदराज कमलक्ष नायक यांनी आपल्या कामगारांना सुखद धक्का दिला आहे. पुणे स्थित कंपनीचे व्यावसायिक वरदराज कमलक्ष यांनी मंगळुरु आणि पुणे कारखान्यातील बारा कामगारांना भेट म्हणून टाटा नॅनो कार दिली आहे.
दिवाळीच्या सुमारास सूरतमधील हिरे व्यावसायिक सावजी ढोलकीया यांनी आपल्या कामगारांना बोनसमध्ये गाडी घर आणि दागिने देऊन मोठी भेट दिली होती. मंगळुरूतील यंत्रसामग्रीचे व्यावसायिक नायक यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवीत आपल्या बारा कामगारांना ही भेट दिली आहे. नायक यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल दोन कोटींची आहे. तर ढोलकीया यांची सहा हजार कोटींची उलाढाल आहे. नायक म्हणाले की ढोलकीया यांच्याशी माझाी तुलना होऊच शकत नाही, मात्र भेटवस्तू देण्यामागची भावना, विचार सारखाच आहे.
वरदराज नायक यांनी सांगितले की, माझ्यासाठी ज्यांनी संपत्ती बनवली त्यांच्याशी मला संपत्ती वाटून घेतलीच पाहिजे. आपल्या व्यवसायाविषयी बोलताना नायक म्हणाले की, १९७४ मध्ये पोखरण अणू चाचणीनंतर पाश्‍चिमात्यदेशांनी भारताला बॉल स्क्रू ची निर्यात करण्यावर बंदी घातली. क्षेपणास्त्र निर्मितीमध्ये या स्कू्रचा उपयोग व्हायचा. त्यावेळी माझ्या एका सहकार्‍याने या स्क्रू निर्मितीच्या व्यवसायाची कल्पना माझ्यासमोर मांडली आणि मी या व्यवसायात उतरलो. नायक यांच्या कंपनीच्या उत्पादनांना सर्वाधिक मागणी जर्मनीमधून आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21136

Posted by on Mar 6 2015. Filed under कर्नाटक, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कर्नाटक, ठळक बातम्या, राज्य (1966 of 2452 articles)


=४५० प्रश्‍नपत्रिका कमी पडल्या= चिपळूण, [५ मार्च] - दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परिक्षा सुरु झाल्या आहेत. सगळीकडे विद्यार्थी आणि पालक ...

×