Home » ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » काश्मिरात शांतता, संचारबंदी मात्र कायमच

काश्मिरात शांतता, संचारबंदी मात्र कायमच

kashmir-cerfueश्रीनगर, [१७ जुलै] – बुरहान वाणीच्या खात्म्यानंतर काश्मीर खोर्‍यात उसळलेल्या हिंसाचाराची धग आता बरीच कमी झाली असली, तरी सावधतेचे उपाय म्हणून खोर्‍यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. सलग नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात ३९ जणांचा मृत्यू, तर ३१०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.
खोर्‍यातील सर्व १० जिल्ह्यांमध्ये संचारबंदी कायम असून, पोलिस व सुरक्षा दलाच्या जवानांकडून प्रभावी गस्त घालण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यावर भर देण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. शनिवारी सकाळी नव्याने उसळलेल्या हिंसाचारात कुपवाडा जिल्ह्यात एक तरुण ठार झाला. त्यानंतर मात्र खोर्‍यात कुठेही हिंसाचाराची घटना घडली नाही. रविवारी सायंकाळपर्यंत कुठेही नव्या हिंसाचाराची नोंद नाही, असे सूत्रांनी सांगितले.
काश्मिरातील स्थितीबाबत अपप्रचार पसरू नये, यासाठी इंटरनेट सेवा आजही बंद असून, शनिवारी दूरसंचार सेवाही बंद करण्यात आली होती. अजूनही ही सेवा बहाल करण्यात आली नाही.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29131

Posted by on Jul 18 2016. Filed under ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य (143 of 2452 articles)


=भाजपाचा दावा= नवी दिल्ली, [१७ जुलै] - सर्वोच्च न्यायालयाने नबाम तुकी यांचे सरकार बहाल करण्याचा आदेश दिला असतानाही, तुकी यांना ...

×