Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » किमान वेतनात वाढ होणार

किमान वेतनात वाढ होणार

=अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी केंद्राचा निर्णय=
Salary_hikeनवी दिल्ली, [२६ नोव्हेंबर] – अर्थव्यवस्था बळकट करून, वस्तू व सेवा क्षेत्रातील मागणी वाढविण्याच्या उद्देशाने कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्याचे तसेच देशभरात हा निर्णय लागू करण्याचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले आहे.
श्रम सचिव शंकर अग्रवाल यांनी आज गुरुवारी ही माहिती दिली. देशातील सर्वच व्यापारी क्षेत्रात कामगारांना एका विशिष्ट प्रमाणात वेतन मिळावे, यासाठी आम्ही कायदा तयार करणार आहोत. केवळ निवडक उद्योगांमध्येच नाही, तर देशातील सर्वच उद्योगांना या कायद्याचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे, असे अग्रवाल यांनी सीआयआयतर्फे आयोजित परिषदेत बोलताना सांगितले.
वाढत्या महागाईतही कर्मचार्‍यांना आपल्या इच्छेनुसार वस्तू व अन्य सेवा खरेदी करता याव्या, यासाठी त्यांची क्रयशक्ती वाढविण्याची आवश्यकता आहे. असे झाले, तरच देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. किमान वेतनात वाढ करण्यात आल्यास रोजगार निर्मितीलाही मोठा वाव मिळणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25768

Posted by on Nov 27 2015. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1141 of 2453 articles)


=पंतप्रधान मोदी यांचे मत= नवी दिल्ली, [२६ नोव्हेंबर] - संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कोणत्याही मुद्यावर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. चर्चा ...

×