Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » कुणाच्याही मनतंत्राने देश चालत नाही

कुणाच्याही मनतंत्राने देश चालत नाही

pm-narendra-modiनवी दिल्ली, [१० डिसेंबर] – संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कामकाजात सातत्याने येत असलेल्या व्यत्ययाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त करून, एखाद्याच्या मनाप्रमाणे लोकशाही चालू शकत नाही, असे सांगत कॉंग्रेसवर अप्रत्यक्ष टीका केली.
लोकशाही ही फक्त निवडणुका आणि सरकारपुरती मर्यादित नसून, मनतंत्र आणि धनतंत्र हे लोकशाही व्यवस्थेवरील दोन महत्त्वाचे धोके आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरून सध्या संसदेत गोंधळ घालणार्‍या कॉंग्रेस पक्षाचे नाव न घेता सांगितले. ज्यामुळे गरिबांचा फायदा होईल असे संसदीय कामकाज होत नसल्यामुळे एकप्रकारे गरिबांचा अधिकार हिरावला जात आहे. संसदेत केवळ जीएसटी विधेयक रखडले आहे, असे नसून गरिबांच्या हिताचे अनेक निर्णय प्रलंबित आहेत, असेही मोदी यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.
आजकाल संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणण्याच्या घटना वाढतच आहे. ‘मेरी मर्जी’ याप्रमाणे माझ्या मनात जे येईल ते मी करीन, अशा प्रकारे लोकशाही व्यवस्था चालते का, असा सवाल करत लोकशाही मनतंत्राने चालत नाही. संसदेत कामकाज होत नसल्यामुळे गरिबांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवले जात आहे आणि हे क्लेषदायक आहे. मात्र, ही चर्चा फक्त जीएसटीपुरतीच मर्यादित आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
जीएसटीचे जे काही व्हायचे असेल ते सर्वसंमतीने होईल आणि प्रत्येकाला देशाच्या भवितव्याचा विचार करावा लागेल. परंतु, गरीब किंवा सर्वसामान्य माणसाचे काय? सध्या संसदेत कामकाज होत नसल्यामुळे गरिबांना नोकरीत मिळणारी बोनसची रक्कम ३५०० वरून ७ हजार करण्याची तरतूद असलेले विधेयकही रखडले आहे. संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालू द्या, अशी विनंती सरकारकडून वारंवार करण्यात येत असल्याचेही मोदी यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26107

Posted by on Dec 11 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1041 of 2453 articles)


=मुख्यमंत्र्यांचे महिला आमदारांना आश्‍वासन= नागपूर, [१० डिसेंबर] - राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष आणि सचिवपद गेल्या वर्षभरापासून रिक्त आहे. हायकोर्टाने हे ...

×