Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » केंद्र सरकारचे काम लोकांपर्यंत पोहचविण्याची गरज

केंद्र सरकारचे काम लोकांपर्यंत पोहचविण्याची गरज

=मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्त्यांना आवाहन=
devendra-fadnavis7मुंबई, [२३ मे] – भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने सर्वोत्तम काम केले असून सरकारला दोन वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने हे काम लोकांपर्यंत व्यापक स्वरूपात पोहचावावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.
प्रदेश भाजपाच्या मुंबई येथे झालेल्या विशेष बैठकीचा समारोप करताना ते बोलत होते. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश, पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, केंद्रीय रसायनमंत्री हंसराज अहिर, महसूलमंत्री एकनाथ खडसे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष पांडुरंग फुंडकर, प्रदेश संघटनमंत्री रवींद्र भुसारी, प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, डॉ. रामदास आंबटकर व ठाणे विभाग अध्यक्ष कपिल पाटील उपस्थित होते. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पहिल्या सत्रात केंद्र सरकारच्या कामगिरीची माहिती दिली.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, केंद्र सरकारने दोन वर्षांत उत्कृष्ट काम केले आहे. या काळात सुरू केलेल्या योजना पाच वर्षांत पूर्ण झाल्यावर आगामी लोकसभा निवडणुकीत कार्यकर्ते ताठ मानेने लोकांकडे मते मागायला जातील व लोकही त्यांचे स्वागत करतील. २६ मे रोजी केंद्र सरकारची दोन वर्षे पूर्ण होत असून, हे जनतेशी संवाद करण्याचे निमित्त आहे. आपल्या सरकारने केलेले काम सामान्य लोकांना सांगणे आवश्यक आहे.
खा. दानवे म्हणाले, केंद्र सरकारची कामगिरी आपल्याला गावाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहचवायची आहे. राज्यातील जनतेशी संवाद साधण्यासाठी केंद्र सरकारचे २६ मंत्री राज्यात येणार आहेत. कार्यकर्त्यांनी त्यांच्या साथीने सरकारचे काम लोकांपर्यंत पोहचवायचे आहे.
सरोज पांडे म्हणाल्या, या आधीच्या सरकारच्या तुलनेत आपल्या सरकारने खूप चांगले काम केले आहे. त्यामुळे आपण सरकारच्या कामाची माहिती दिल्यावर लोक जरूर स्वागत करतील.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी भाजपा सरकार केंद्रात सत्तेवर आले त्यावेळी देशाची परिस्थिती वाईट होती व निराशेचे वातावरण होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारने दोन वर्षांत देशाला वाईट परिस्थितीतून बाहेर काढले आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाला मोदी सरकारने काही ना काही दिले आहे. सरकारच्या या कामगिरीची माहिती देण्यासाठी दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने घरोघर जायचे आहे.
व्ही. सतीश म्हणाले, दोन वर्षांपूर्वी देशातील लोक निराश होते. भाजपा सरकारने दोन वर्षांच्या कामाने देशात नवी उमेद निर्माण केली आहे. आपल्या पक्षावर देशाने मोठी जबाबदारी दिली आहे, याचे भान कार्यकर्त्यांनी ठेवणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले, भाजपा सरकारच्या कारकीर्दीत तीव्र गतीने व भ्रष्टाचारमुक्त काम होत आहे. भाजपाने स्वच्छ, संवेदनशील व कार्यक्षम सरकार दिले आहे.
प्रदेश संघटनमंत्री रवींद्र भुसारी यांनी केंद्र सरकारच्या दोन वर्षांच्या पूर्ततेनिमित्ताने राज्यभर पक्षातर्फे होणार्‍या कार्यक्रमांची योजना स्पष्ट केली.
बैठकीस पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व विशेष निमंत्रित उपस्थित होते.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28464

Posted by on May 24 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (275 of 2448 articles)


तेहरान, [२३ मे] - भारत आणि इराण संयुक्तपणे विकसित करणार असलेल्या चाबहार मुक्त व्यापार क्षेत्रात भारताने आज सोमवारी कोट्यवधी डॉलर्सची ...

×