richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » केजरीवालांनी माफी मागावी

केजरीवालांनी माफी मागावी

=भाजपाचा जोरदार हल्ला=
mj-akbar1नवी दिल्ली, [२७ डिसेंबर] – डीडीसीएतील कथित घोटाळ्याचा तपास करण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गठित केलेल्या आयोगानेच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना क्लीन चिट दिली असल्याने, जेटली यांची समाजात बदनामी करणार्‍या केजरीवालांनी आता त्यांची जाहीरपणे माफी मागावी, अशी मागणी भाजपाने आज रविवारी केली.
केजरीवाल सरकारच्या तीन सदस्यीय आयोगाच्या अहवालात जेटली यांचा कुठेही उल्लेख नाही. शिवाय, जेटली यांच्या कार्यकाळात एका पैशाचाही भ्रष्टाचार झाला नसल्याचे आयोगाने नमूद केले आहे. पण, सत्यता पडताळून न पाहता केजरीवाल यांनी जेटलींवर वाट्टेल तसे आरोप केले. जेटली यांच्या चौकशीसाठी आयोगही गठित केला. सीबीआयने त्यांच्या कार्यालयावर धाड घातली नसतानाही, जेटलींना वाचविण्यासाठी सीबीआयने आपल्या कार्यालयातून डीडीसीएशी संबंधित फाईल्स ताब्यात घेतल्या असल्याचाही आरोप त्यांनी केला. जेटली यांच्या राजीनाम्यासाठी संसदेसोबतच त्यांच्या निवासस्थानाबाहेरही आंदोलन करण्यात आले. आयोगाच्या अहवालामुळे केजरीवाल आता पूर्णपणे तोंडघशी पडले आहेत. त्यामुळे त्यांनी तत्काळ जेटली यांची माफी मागायलाच हवी, असे भाजपाचे प्रवक्ते एम. जे. अकबर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26287

Posted by on 9:56 pm. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google